शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
Narendra Modi : "माझ्याकडे ना सायकल, ना घर; जेएमएम, काँग्रेसच्या नेत्यांनी भ्रष्टाचारातून अमाप संपत्ती जमवली"
3
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
4
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
5
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
6
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
7
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
8
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
9
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
10
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
11
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
12
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
13
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
14
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
15
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
16
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
17
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
18
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
19
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
20
Swami Samartha: स्वामींना आवडणारी 'ही' एकच गोष्ट सोडा; स्वामी सगळं चांगलंच करतील!

अमली पदार्थांची तस्करी : लेडी डॉन चंदा ठाकूर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:59 PM

गेल्या अनेक वर्षांपासून मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेली चंदा प्रदीप ठाकूर (वय ५०) नामक महिला आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने आज नाट्यमयरीत्या अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या अनेक वर्षांपासून मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेली चंदा प्रदीप ठाकूर (वय ५०) नामक महिला आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने आज नाट्यमयरीत्या अटक केली. शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील इतवारी रेल्वेस्थानक परिसरात अमली पदार्थाची तस्करी करणारी चंदा लेडी डॉन म्हणून कुख्यात आहे. तिच्या अड्ड्यावर ३१ जुलैला गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला होता. यावेळी तिची मुलगी आरती ठाकूर तसेच नरेंद्र ऊर्फ बाल्या पवनीकर आणि रजनीश पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून २५ ग्राम हेरॉईन, तीस हजारांची दारू तसेच रोख एक लाख ६३ हजार रुपये असा एकूण तीन लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. तेव्हापासून चंदा फरार होती. ती आपल्या कामठी मार्गावरच्या घरी परतल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने मंगळवारी भल्या सकाळी तेथे छापा घातला आणि चंदाला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनच्या पथकाने ही कामगिरी बजावली.आत्महत्येची धमकीचंदाच्या खोलीच्या दारावर बाहेरून कुलूप लावून होते. मात्र खबर पक्की असल्यामुळे पोलिसांनी खिडकीतून मोठ्याने आवाज देऊन चंदाला बाहेर येण्याचे आवाहन केले.पोलीस अटक करून कोठडीत डांबणार याची कल्पना आल्यामुळे चंदाने पोलिसांना आत आल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. पोलिसांनी तिला दाद न देता दार तोडले आणि चंदाला ताब्यात घेतले.

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटक