स्वप्नं दाखवली वर्ल्ड क्लासची, नागपूरचा फुटाळा गेला वेस्ट क्लासमध्ये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 20:23 IST2025-06-27T20:22:25+5:302025-06-27T20:23:28+5:30

Nagpur : स्वच्छता आणि देखभाल का नाही?

Dreaming of world class, Nagpur's Futala went to the Waste Class! | स्वप्नं दाखवली वर्ल्ड क्लासची, नागपूरचा फुटाळा गेला वेस्ट क्लासमध्ये!

Dreaming of world class, Nagpur's Futala went to the Waste Class!

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
फुटाळा फक्त तलाव नव्हता, तो नागपूरच्या हृदयाचा ठाव होता. सकाळी चालणं, संध्याकाळच्या गप्पा, कुटुंबासोबत निवांत वेळ... पण हे सगळं विसरून महापालिकेने विकास नावाची खेळी खेळली. तलाव परिसरात साकारलेले तब्बल १६० कोटी रुपयांची विकासकामे गेले दीड वर्षापासून धूळ खात पडून गॅलरीतील आहेत. व्ह्यू बसायच्या जागा, म्युझिकल फाउंटेन, सुंदर फूटपाथ, स्ट्रीट लाइटसह सर्व सुविधा अक्षरशः पडद्याआड गेल्या आहेत. तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग आणि खचत चाललेल्या भिंतींमुळे या परिसराची दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासन सर्वोच्च न्यायालयाने बांधकामांवर घातलेल्या बंदीचा हवाला देत देखभालीची जबाबदारी झटकत आहे.


स्वच्छता आणि देखभाल का नाही?
एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने फुटाळा तलाव परिसरात नवीन बांधकामांवर बंदी घातली आहे. सध्या हा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र जाणकारांच्या मते न्यायालयाचा हवाला देत प्रशासनाने तलाव परिसराकडे पाठ फिरवली आहे.


फाउंटेन सुरू झाला की नाही?
नासुप्रचा दावा आहे की, फाउंटेनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. मात्र तज्ज्ञांचा दावा आहे की, फाउंटेन पूर्णपणे तयारच झालेला नाही. पहिल्यांदा फाउंटेनची वायरिंग कीड लागून खराब झाली, नंतर पुन्हा वायरिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण तरीही फाउंटेन नियमितपणे सुरू झालेला नाही.


खचणाऱ्या भिंती आणि कचऱ्याचे साम्राज्य
फुटाळा तलाव परिसराच्या अनेक ठिकाणी भिंती खचत आहेत, काही भागांमध्ये भिंती कोसळल्याही आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. तलावाच्या आजूबाजूच्या भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले आहेत आणि प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे.


कोणती विकासकामे केली ?
नासुप्रने तलावाच्या मधोमध जुन्या कारंजाच्या जागी ५० कोटींचा 'म्युझिकल फाउंटन' साकारला. ११० कोटी खर्चुन महामेट्रोने व्ह्यू गॅलरी, फूटपाथ, सौंदर्गीकरण, रस्ते आणि अपूर्ण पार्किंग प्लाझा विकसित केला. फूड स्टॉल, दुकाने, आकर्षक बाक, रंगरंगोटी, सार्वजनिक शौचालयांची कामे करण्यात आली.


फाउंटेन सुरू झाला की नाही?
नासुप्रचा दावा आहे की, फाउंटेनचे काम पूर्ण झाले आहे. मात्र न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने तो अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. मात्र तज्ज्ञांचा दावा आहे की, फाउंटेन पूर्णपणे तयारच झालेला नाही. पहिल्यांदा फाउंटेनची वायरिंग कीड लागून खराब झाली, नंतर पुन्हा वायरिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले, पण तरीही फाउंटेन नियमितपणे सुरू झालेला नाही.
 

Web Title: Dreaming of world class, Nagpur's Futala went to the Waste Class!