शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

‘ड्रॅगन फ्रूट’शेतीतून साधला प्रगतीचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:10 IST

मधुसूदन चरपे गुमगाव : योग्य नियोजन आणि मेहनतीच्या भरवशावर वैदर्भीय जमिनीतील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची शेती फुलविली आहे. ...

मधुसूदन चरपे

गुमगाव : योग्य नियोजन आणि मेहनतीच्या भरवशावर वैदर्भीय जमिनीतील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची शेती फुलविली आहे. ही किमया गुमगाव येथील शेतकरी अरुण दादाजी देवतळे पाटील यांनी केली आहे. त्यांनी कमी खर्चात फायदेशीर शेती करून उन्नतीचा मार्ग शोधला आहे. देवतळे यांनी लागवड केलेली ड्रॅगन फ्रूटची शेती सद्यस्थितीत फळाला आली असून, त्यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

दरवर्षी वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे खरीप हंगामात होणारे नुकसान, शेतकऱ्यांना मिळत असलेला कमी भाव यामुळे देवतळे यांनी पारंपरिक शेतीला बगल देण्याचा निश्चय केला. आपल्या शेतीत काही तरी नाविन्यपूर्ण आणि वेगळे करून दाखविण्याच्या ध्यासापोटी ते विविध कृषी प्रदर्शनात सहभागी झाले. यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा ध्यास मनी धरला.

त्यांनी गुमगाव-धानोली रोडलगतच्या शिवारात एका एकरात तीन वर्षांपूर्वी ही लागवड केली. विविध माध्यमे, कृषितज्ज्ञ आणि अनुभवी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनातून एका एकरात ४८० स्टॅन्ड व गोलचक्री देऊन चहूबाजूंनी १९२० जागी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. लागवड केल्यापासून तर फळधारणा होईपर्यंत एका एकरात एक ते दीड लाख रुपये खर्च आला आहे. चालू पहिल्या तोडणीत जवळपास आतापर्यंत ७० हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले असून, जसजसे फळझाडाचे आयुर्मान वाढत जाईल तसतसे उत्पन्नही वाढत जाणार असल्याचेही देवतळे यांनी सांगितले. या फळे लागवडीचा कालावधी जुलै ते ऑक्टोबर या महिन्यादरम्यान असतो. गेल्या अडीच महिन्यापूर्वीपासून तर आजच्या स्थितीत ड्रॅगन फ्रूटच्या फळांनी झाडे आजही लदबदली आहेत. या फळांचा तोडा महिन्यातून किमान दोन ते तीनवेळा करावा लागतो. नागपूर येथील कळमना मार्केट, जामठास्थित कॅन्सर हॉस्पिटल आणि इतरही किरकोळ फळविक्रेत्यांना २०० ते २२५ रुपये प्रति किलोने येथील ड्रॅगन फ्रूट विकल्या जात आहे. ड्रॅगन फ्रूटची एकदा लागवड केल्यानंतर ३० ते ३५ वर्षे फळ देणारे हे पीक आहे.

ड्रॅगन फ्रूट हे महाराष्ट्रात अत्यंत दुर्मिळ पीक मानल्या जाते. साधारणपणे थायलंड, व्हिएतनाम, इस्रायल, श्रीलंका इत्यादी देशात ड्रॅगन फ्रूटची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता मात्र भारतातही या फळाची लागवड करणेसुद्धा सुरू झाले आहे.

काय आहे ड्रॅगन फ्रूट?

ड्रॅगन फ्रूटमध्ये जीवनसत्व ‘क’ चे प्रमाण अत्याधिक असते. त्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी हे फळ उपयुक्त आहे. डेंग्यू आजार झालेल्या रुग्णांच्या पांढऱ्या पेशी कमी झालेल्या असतात. या कमी झालेल्या पेशी वाढविण्यासाठी रुग्णांना ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. शिवाय शरीरासाठी त्याचे आरोग्यदायी लाभही भरपूर असल्याने हल्ली बाजारात या ड्रॅगन फ्रूटला खूप मागणी आहे.

----

पारंपरिक शेती ही तोट्याची झाली आहे. त्यातच युवकांना रोजगार मिळणे दिवसेंदिवस कठीण झाले आहे. शेती परवडणारी नाही, अशी नेहमी आमच्या शेतकऱ्यांची ओरड असते. मात्र शेतीचे योग्य नियोजन, जिद्द आणि मनापासून परिश्रम केले, नाविन्यपूर्ण शेतपिकांचे प्रयोग राबवून ड्रॅगन फ्रूटसारख्या पिकातूनसुद्धा आर्थिक उन्नती साधता येते.

- अरुण देवतळे, शेतकरी, गुमगाव.