शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे काम ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:11 IST

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द करण्यात आली. आता ...

नागपूर : महाविकास आघाडीचे सरकार येताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने समितीवरील अशासकीय सदस्यांची नेमणूक रद्द करण्यात आली. आता वर्ष होत आहे; परंतु नवीन सदस्यांची नेमणूक झालेली नाही. परिणामी खंड प्रकाशनाचे काम ठप्प पडले आहे. त्यामुळे सदस्यांची नेमणूक करून समितीचे पुनर्गठण तातडीने करा, अशी मागणी भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी केली आहे.

राज्यातील सत्तांतरण झाल्यानंतर २७ जानेवारी २०२० राेजी शासन निर्णयानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नेमणुका रद्द केल्या. याला आता वर्ष झाले. राज्य शासनाने नुकतेच जोतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीची पुनर्रचना केली. यात सदस्यांची नेमणूक केली. त्याबद्दल शासनाचे अभिनंदन. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या पुनर्रचनेकडे दुर्लक्ष का, असा प्रश्नही या निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी तातडीने या समितीवर सदस्यांची नेमणूक करून समितीचे काम सुरू करावे, अशी मागणी प्रकाश बन्सोड यांनी केली आहे.