शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

डाॅ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ : विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचल्याचा प्राथमिक अंदाज प्रवीण खिरटकर वरोरा (चंद्रपूर) : कर्मयोगी बाबा ...

आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या सीईओ : विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचल्याचा प्राथमिक अंदाज

प्रवीण खिरटकर

वरोरा (चंद्रपूर) : कर्मयोगी बाबा आमटे यांची नात आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक बाब सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप पुढे आले नसले तरी नैराश्येतून विषारी इंजेक्शन स्वत:ला टोचून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेने आनंदवनावर शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सकाळी डाॅ. शीतल आमटे-करजगी यांचे पती आपल्या आई-वडिलांना घेऊन वरोरा येथील एका खासगी रुग्णालयात गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांनी डाॅ. शीतल यांना आवाज दिला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी दार उघडून घरात प्रवेश केला असता डाॅ. शीतल या घरात पडून होत्या. त्यांनी लगेच आनंदवनातील रुग्णवाहिकेने डाॅ. शीतल यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ही धक्कादायक घटना वरोरा शहरासह संपूर्ण राज्यात वाऱ्यासारखी पसरली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता विषारी इंजेक्शनने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला. हायप्रोफाईल केस असल्यामुळे चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वरोराचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डाॅ. नीलेश पांडे व ठाणेदार दीपक खोब्रागडे यांनी पोलीस ताफ्यासह आनंदवनातील डाॅ. शीतल आमटे-करजगी यांच्या निवासस्थानाची चौकशी केली. मात्र आत्महत्येबाबतचा कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. यानंतर चंद्रपूर येथील फाॅरेन्सिक लॅबच्या चमूने घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यांनाही काही गवसले नाही. सायंकाळी नागपूर येथील फाॅरेन्सिक लॅबच्या चमूला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरूच होता. डाॅ. शीतल आमटे-करजगी मागील काही महिन्यांपासून नैराश्येत असल्याचे समजते. यातूनच त्यांनी ही टोकाची भूमिका घेतली असावी, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. मागील काही महिन्यांपासून आनंदवनात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाल्याचे सोशल मीडियावरून पुढे येत होते. अलीकडच्या काळात डाॅ. शीतल यांची आई भारती आमटे, भाऊ काैस्तुभ आमटे व त्यांच्या पत्नी ही मंडळी आनंदवनातून बाहेर पडली होती. यानंतर त्यांचे वडील डाॅ. विकास आमटे हेदेखील आनंदवनात वास्तव्यास नव्हते. ही सर्व मंडळी गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पात डाॅ. प्रकाश आमटे यांच्याकडे राहत होती. दरम्यानच्या काळात डाॅ. शीतल यांनी सोशल मीडियावर महारोगी सेवा समितीवर काही आरोप केले होते. यावर आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करून या आरोपांचे खंडन केले. यासोबतच डाॅ. शीतल यांना मानसिक ताण असून त्या नैराश्येत असल्याचे नमूद केले होते. एकूणच या घडामोडीतून डाॅ. शीतल या एकाकी पडल्या होत्या असे लक्षात येते. अशातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

डाॅ. शीतल आमटे यांचे पहिली ते १० वीपर्यंतचे शिक्षण वरोरा येथे झाले. ११ ते १२ वीचे शिक्षण आनंदनिकेतन महाविद्यालयातून पूर्ण केल्यानंतर नागपूर येथील शासकीय महावि‌द्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. कर्मयोगी बाबा आमटे यांचा वसा तिसऱ्या पिढीच्या रूपाने त्या चालवित होत्या. पुणे येथील करजगी परिवारातील गौतम करजगी यांच्यासोबत विवाह झाला. त्यांना सहा वर्षाचा शर्वील नावाचा मुलगा आहे. २०१७ पासून डाॅ. शीतल महारोगी सेवा समिती आनंदवनच्या मुख्य कार्यकारी पदावर कार्यरत होत्या. त्यांचे पती गौतम करजगी आनंदवनात अंतर्गत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. आनंदवनात मुख्य व्यवसाय शेती असून यासोबतच दुग्धव्यवसाय, मस्त्यव्यवसाय, हातमाग सतरंज्या तयार करणे, कपाटे तयार करणे, तीन चाकी सायकल तयार करणे आदी साहित्य या वर्कशाॅपमध्ये तयार केले जाते. या सर्व बाबींवर डॉ. शीतल कार्य करीत होत्या. आनंदवनात कुष्ठरोगी, अंध, अपंग, निराधार व्यक्ती मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.

कोरोना योद्धा म्हणून सत्कार

प्रशासनाने कोरोना विषाणूविरोधात लढण्याकरिता समाजातील घटकांना कोरोना योद्धा म्हणून सामील होण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोरोना योद्धा म्हणून डॉ. शीतल आमटे सामील होऊन कार्य केले. या कार्याबाबत १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती वरोरा येथे सत्कार करण्यात आला होता.

बाबांच्या पायाजवळ अंतिम विसावा

कर्मयोगी बाबा व साधनाताईंच्या समाजसेवेचा वसा पुढे नेत असताना वेळोवेळी बाबा व साधनाताईंच्या स्मृतींना उजाळा देत होत्या. आनंदवनातील श्रद्धावनात कर्मयोगी बाबा व साधनाताईंच्या समाधीजवळ डॉ. शीतल आमटे अंतिम विसावा घेणार आहेत.

शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचा उलगडा होईल

तज्ज्ञ वैद्यकीय समितीच्या समक्ष तब्बल दोन तास चालले शवविच्छेदन

चंद्रपूर : डाॅ. शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असला तरी आत्महत्या वा अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबतचा उलगडा होईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डाॅ. कारेकर, डाॅ. ढोबळे व डाॅ. रामटेके या तीन तज्ज्ञ वैद्यकीय समितीच्या समक्ष शवविच्छेदन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी शवविच्छेदन सुरू झाले. ते रात्री ८ वाजतापर्यंत चालले. यानंतर ८ वाजून १५ मिनिटांनी मृतदेह वरोरा येथील आनंदवनकडे रवाना करण्यात आला.

आमटे कुटुंबीय आनंदवनात

डाॅ. शीतल आमटे यांच्या मृत्यूची वार्ता कळताच आमटे कुटुंबीय गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथून सायंकाळी आनंदवनात पोहचले. डाॅ. शीतलचे वडील डाॅ. विकास आमटे, आई भारती आमटे, भाऊ कौस्तुभ आमटे, पल्लवी आमटे यांच्यासह डाॅ. प्रकाश आमटे, डाॅ. मंदाकिनी आमटे, दिगंत आमटे ही मंडळी आनंदवनात येताच घरात गेली. त्यांनी या घटनेबाबत कुणाशीही संवाद साधला नाही.