डॉ. राणी बंग नागपुरातील रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 21:16 IST2022-11-18T21:12:09+5:302022-11-18T21:16:10+5:30

Nagpur News ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांना शुक्रवारी नागपूरच्या सीम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Dr. Rani Bang admitted to Nagpur hospital; Improvement in health | डॉ. राणी बंग नागपुरातील रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधार

डॉ. राणी बंग नागपुरातील रुग्णालयात दाखल; प्रकृतीत सुधार

नागपूर : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांना शुक्रवारी नागपूरच्या सीम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

डॉ. राणी बंग यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना लागलीच सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉ. जाजू आणि डॉ. कलंत्री यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना नागपूर येथील सीम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या हॉस्पिटलचे संचालक डॉ. लोकेंद्र सिंह म्हणाले, सुरुवातीला त्यांच्यावर शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते; परंतु नंतर त्याची गरज वाटली नाही. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Web Title: Dr. Rani Bang admitted to Nagpur hospital; Improvement in health