प्रकाश गजभिये यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:13 AM2020-11-28T04:13:40+5:302020-11-28T04:13:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्कृष्ट उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश गजभिये यांना दहाव्या ...

Dr. Prakash Gajbhiye Ambedkar Award () | प्रकाश गजभिये यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार ()

प्रकाश गजभिये यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उत्कृष्ट उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार प्रकाश गजभिये यांना दहाव्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील शासकीय मेयर हॉल, जुहू लेन, अंधेरी पश्चिम येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी माजी खासदार सुनील गायकवाड, आमगाव गोंदियाचे काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे, भारत सरकार केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सदस्य कैलास मासूम, कलावंत सुनील पॉल, विकी राज वानखेडे आदी उपस्थित होते. इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक, दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव, मंत्रालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावणे, शाम हॉटेलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक घोषित करावे, यशवंत स्टेडियम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक निर्माण व्हावे, अशा अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली.

Web Title: Dr. Prakash Gajbhiye Ambedkar Award ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.