शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती! राज्यघटनेचा मसुदा लिहिलेल्या टाईपरायटरसह अन्य वस्तूंवर होणार रासायनिक प्रक्रिया; १०० वर्षे टिकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2022 07:00 IST

Nagpur News डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या वस्तूंचे जतन करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. त्यांनी राज्यघटना ज्यावर टाईप केली त्या टाईपरायटरवर रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे.

ठळक मुद्देबाबासाहेबांचे कपडे, कोट, टाय, टोपी, जॅकेट, खुर्चीचाही समावेश

आनंद डेकाटे

नागपूर :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपयोगात आणलेल्या वस्तू येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक आहेत. त्या चिरकाल टिकाव्यात म्हणून त्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया केली जात आहे. जवळपास ८५ टक्के वस्तूंवर ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात बाबासाहेबांनी लिहिलेला ऐतिहासिक ग्रंथ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ तसेच भारतीय राज्यघटनेचा मसुदा पहिल्यांदा ज्या टाईपरायटवर टाईप केला त्याचा समावेश आहे. शांतिवन चिचोली येथील संग्रहालयातील या ऐतिहासिक वस्तूंवर अजबबंगला या केंद्रीय वस्तूसंग्रहालयात रासायनिक प्रक्रिया केली जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी प्रशिक्षित धम्म सेनानी तयार व्हावेत, असे विचार व्यक्त केले होते. धम्माचा सर्वांगीण अभ्यास असलेला प्रशिक्षित उपासक समाजात तयार व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याच्या उद्देशाने डॉ. आंबेडकरांचे विश्वासू सहकारी धम्म सेनानी वामनराव गोडबोले कामाला लागले. यासाठी त्यांना काटोल रोडवरील चिचोली या गावातील एका महिलेने आपले शेत दान दिले. या जागेवरच त्यांनी शांतिवन हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी महाविद्यालय उभारण्याचा त्यांचा मानस होता.

त्यांच्याकडे महामानवाच्या अनेक वस्तूही होत्या. डॉ. आंबेडकरांचे खासगी सचिव नानकचंद रत्तू यांनीही त्यांना त्यांच्याकडे असलेल्या बाबासाहेबांच्या अनेक वस्तू भेट दिल्या. माईसाहेबांनीसुद्धा (बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी) त्यांना काही वस्तू भेट दिल्या. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले कपडे, कोट, टाय, टोपी, जॅकेट, खुर्ची यासह बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय राज्यघटनेच्या मसुदा ज्या टाईपरायटरवर सर्वप्रथम टाईप करण्यात आला होता, तो टाईपरायटर. ऐतिहासिक धम्म दीक्षा सोहळ्यासाठी वापरण्यात आलेली बुद्धमूर्ती आदींसह महामानवाच्या जीवनाशी संबंधित व त्यांनी प्रत्यक्ष वापरलेल्या वस्तूंचा यात समावेश आहे.

आता या वस्तू कुठे ठेवायच्या, असा प्रश्न त्यांच्यापुढे होता. तेव्हा त्यांनी एक संग्रहालय उभारले. निधीअभावी त्यांना प्रशिक्षण इमारतीचे कामही पूर्ण करता आले नाही. त्यांच्यानंतर संजय पाटील हे शांतिवन चिचोलीची देखभाल करू लागले. येथील संग्रहालय तसे लहान. तसेच शास्त्रोक्त पद्धतीने ते उभारण्यात न आल्याने महामानवाच्या वस्तू नष्ट होण्यास सुरुवात झाली. कपड्यांना वाळवी लागायला लागली. आता या वस्तू वाचविणे हेच एक मोठे आव्हान होते. यासाठी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी धावपळ केली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. महामानवांच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्या वस्तू अनेक वर्षे टिकून राहतील, या कामाला सुरुवात झाली. ती जवळपास पूर्णत्वाकडे आली आहे.

या ऐतिहासिक वस्तू योग्य ठिकाणी राहाव्यात म्हणून संग्रहालयाच्या इमारतीसाठी शासनाने विदर्भ विकास पॅकेज अंतर्गत ४० कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर केला. यासोबतच पर्यटन विकासांतर्गत १७ कोटी रुपयाचा निधी मंजूर केला. या निधीतून आता महामानवाच्या ऐतिहासिक वस्तूंंसाठी भव्य संग्रहालय, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, मेडिटेशन सेंटर, उपासक गृह, बौद्ध धम्माचे शिक्षण देणारे प्रचारक विद्यालयाची इमारत, वसतिगृह आदी इमारती बांधून झाल्या आहेत. शेवटच्या फिनिशिंगचे काम शिल्लक आहे.

 

शांतिवन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयात महामानवाशी संबंधित ५०० वर वस्तू आहेत. त्यातील ४०० वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पार पडली आहे. परंतु संग्रहालयाचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक आहे. वस्तू संग्रहालय तातडीने सुरू झाले नाही तर रासायनिक प्रक्रिया झालेल्या वस्तू कुठे ठेवणार. त्याची योग्य देखभाल न झाल्यास त्या पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- संजय पाटील,

कार्यवाह, शांतिवन चिचोली

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती