डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:07 AM2021-03-06T04:07:56+5:302021-03-06T04:07:56+5:30

नागपूर : मतदार नोंदणी अभियानाअंतर्गत ज्या नवीन मतदारांनी आपली नोंदणी केली आहे, अशा नवमतदारांना आपले डिजिटल निवडणूक ओळखपत्र स्वतः ...

Download digital voter ID card | डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करा

डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करा

Next

नागपूर : मतदार नोंदणी अभियानाअंतर्गत ज्या नवीन मतदारांनी आपली नोंदणी केली आहे, अशा नवमतदारांना आपले डिजिटल निवडणूक ओळखपत्र स्वतः काढण्याची संधी उपलब्ध असून, शनिवार व रविवार (६ व ७ मार्च ) या दोन दिवशी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार सहायता ॲपद्वारा डिजिटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येणार आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातून यासंदर्भात माहिती जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगातर्फे राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल व मतदार साहाय्यता ॲपवर ज्या मतदारांनी १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी केली आहे. ज्यांनी आपला मोबाइल क्रमांक नोंदविला आहे, अशा मतदारांना ई-पिक डाउनलोड करण्याची सुविधा राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल ( एनव्हीएसपीडॉटइन ) व मतदार साहाय्यता ॲपद्वारा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

६ मार्च व ७ मार्च या दोन दिवशी सर्व मतदान नोंदणी अधिकारी सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय ई-पीक डाउनलोड करण्याकरिता सुविधा व साहाय्य उपलब्ध करून देणार आहे. उपरोक्त दिवशी व्यतिरिक्त अन्य दिवशी हे केंद्रीय स्तरावर मतदान अधिकारी संबंधित मतदारांशी संपर्क साधून मतदारांना पिक डाउनलोड करण्यासंदर्भात सुविधा व साहाय्य उपलब्ध करून देणार आहे. १ जानेवारीनंतर ज्यांनी मतदार म्हणून नवीन नोंदणी केली आहे. त्यांना ही सुविधा घेता येणार आहे.

Web Title: Download digital voter ID card

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.