शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बिनविरोध’च्या तक्रारीत तथ्य आढळल्यास नव्याने निवडणूक?; ६९ प्रकरणांची चौकशी, ‘नोटा’चे काय?
2
पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन; ८२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
4
‘बिनविरोध’वर गंडांतर; चेंडू आता हायकोर्टात, मनसेने दाखल केली याचिका, चौकशी करण्याची मागणी
5
काँग्रेसने ७० वर्षे शहरी विकासाकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्दशा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 
6
शरद पवार पक्ष पुढे नेणार, की पुतण्यासोबत जाणार? मनपा निवडणुकीनंतर आगे आगे देखो होता है क्या!
7
ठाणे पालिकेवर महायुतीचाच भगवा फडकणार, ११० उमेदवार निवडून येतील: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
8
आम्ही काय केले? विचारणाऱ्यांनी आरसा पाहायला हवा; नाव न घेता अजितदादांना फडणवीसांचा सूचक इशारा
9
भाजपवर टीका नाही, पालिका अन् तेथील स्थानिक प्रश्नांबद्दल बोललो; अजित पवारांचे स्पष्टीकरण
10
‘मायावी’ महामुंबईसाठी राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांचे ‘जाळे’; भाजप-शिंदेसेनेचा जाहीरनामा कधी?
11
सत्ता अबाधित ठेवायला पक्ष, घर फोडत आहेत, आमच्या कामांचे श्रेय तुम्ही का घेता?: उद्धव ठाकरे
12
सत्ताधाऱ्यांच्या काळात ठाणे शहराची ओळख बदलली; संजय राऊतांची महायुतीवर टीका
13
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मनमानीला अखेर चाप; निवडणुकीला स्थगिती, हायकोर्टाचे ताशेरे
14
उमर खालीद, शरजिल इमामला दिलासा नाहीच, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळाला; अन्य ५ जणांना जामीन
15
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला; एकाला अटक, हेतूची चौकशी सुरू
16
ऐन निवडणुकीत मनसेला मुंबईत मोठा धक्का; माजी नगरसेवक संतोष धुरी भाजपाच्या वाटेवर
17
Video: विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून पुसल्या जातील; रवींद्र चव्हाणांच्या विधानानं वाद
18
मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश; रक्ताने पत्र लिहून इच्छामरणाची मागणी
19
खुला प्रवर्ग कुणासाठी राखीव नाही, सरकारी नोकरीत निवड मेरिटवर व्हावी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
20
उल्हासनगरमध्ये अर्धे उमेदवार कोट्यधीश! ९३ कोटींचे मालक भाजपाकडे तर ५७ कोटींचे धनी शिंदेसेनेकडे
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील वर्धा रोडवरील डबल डेकर जून २०१९ पर्यंत पूर्ण होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:23 IST

महामेट्रोच्या नागपूर मेट्रो प्रकल्पांतर्गत वर्धा रोडवर मेट्रोच्या कामांतर्गत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पूलाचे बांधकाम जून-२०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल डेबल डेकरशी जुळणार असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग पलीकडे राहणारे नागरिक थेट वर्धा रोडशी जुळणार आहे.

ठळक मुद्देमनीषनगर रेल्वे क्रॉसिंगशी जोडणार : तीन मार्गावरून वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोच्यानागपूरमेट्रो प्रकल्पांतर्गत वर्धा रोडवर मेट्रोच्या कामांतर्गत बांधण्यात येणाऱ्या डबल डेकर पूलाचे बांधकाम जून-२०१९ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल डेबल डेकरशी जुळणार असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग पलीकडे राहणारे नागरिक थेट वर्धा रोडशी जुळणार आहे.शहरातील पहिला डबल डेकर नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. याशिवाय मेट्रो मार्गाखाली तयार होणारा राष्ट्रीय महामार्ग मनीषनगर उड्डाण पुलाशी जुळणार आहे. डबल डेकर अजनी चौकापासून प्राईड हॉटेलपर्यंत राहणार आहे. डबल डेकरचे बांधकाम राष्ट्रीय महामार्गांतर्गत महामेट्रोतर्फे करण्यात येत आहे. या अंतर्गत खाली स्थानिक रस्ता, वर डबल डेकर आणि त्यावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. बांधकामासाठी एनएचएआयने मेट्रोला ४८० कोटी रुपये द्यायचे आहेत. आतापर्यंत महामेट्रोला एनएचएआयकडून केवळ १०० कोटी रुपये मिळाले आहेत.

वाहतूक होणार सुलभनागपूर मेट्रोचे बांधकाम शहराच्या चारही बाजूला ३४ महिन्यांपासून सुरू आहे. मार्च-२०१९ पर्यंत मिहान स्टेशन ते सीताबर्डीपर्यंत जवळपास ११.५ कि़मी. अंतरावर मेट्रो रेल्वे धावणार आहे. डबल डेकरमुळे वर्धा रोडवरील वाहतूक सुलभ होणार आहे. महामेट्रोला मनीषनगर उड्डाणपूलआणि रेल्वे उड्डाण पूलासाठी १७ कोटी रुपये चार महिन्यांपूर्वीच मिळाले आहे. आतापर्यंत एनएचएआयकडून मेट्रोच्या खात्यात २६५ कोटी रुपये आले आहेत. त्यामुळे बांधकामाची गती वाढली आहे. त्यामुळे जून-२०१९ पर्यंत वर्धा रोडवर तिन्ही मार्गावरून लोकांची ये-जा सुरू होणार आहे.वर्धा रोडवर गेल्या काही वर्षांत वाहतूक वाढली आहे. निरंतर होणाऱ्या जाममुळे नागरिक कंटाळले आहेत. पण डबल डेकरमुळे नागरिकांना अजनी चौकापासून प्राईड हॉटेलपर्यंत न थांबता काही मिनिटातच पोहोचता येईल. याशिवाय मनीषनगरकडून येणाऱ्या नागरिकांना रेल्वे क्रॉसिंग पुलावरून न थांबता थेट राष्ट्रीय महामार्गावर येता येईल.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर