शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर, परिचारिकांनो नम्रपणे वागा!

By admin | Updated: May 19, 2014 00:52 IST

सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी नम्रपणे वर्तणूक करा, असे फर्मान खुद्द अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना द्यावे लागले.

 नागपूर : सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी नम्रपणे वर्तणूक करा, असे फर्मान खुद्द अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना द्यावे लागले. या संदर्भातील एक पत्र युथ काँग्रेसलाही दिले. या पत्रामुळे आणि इतर मागण्या मान्य झाल्याने मागील चार दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण युथ काँग्रेसने मागे घेतले. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदी कारभारामुळे रुग्ण त्रस्त होते. रक्तापासून ते औषधे आणि इतर चाचण्यांसाठी येथील रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जात होता. यातच डॉक्टरांकडून रुग्णांना मिळणारी वागणूक सौजन्यपूर्वक नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारीला घेऊन युथ काँग्रेसच्यावतीने अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांना घेराव घालून तक्रारींचे निवेदन दिले. मात्र निराकरण होत नसल्याचे आणि रुग्णांकडून तक्रारी थांबत नसल्याचे पाहत युथ काँग्रेसने सुपर स्पेशालिटी रुग्णालयासमोर मंडप टाकून साखळी उपोषण सुरू केले. या चार दिवसांत त्यांच्याकडे शेकडो रुग्णांनी तक्रारी केल्या. यात सर्वात जास्त तक्रारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या औषधांच्या तुटवड्यावरून, जेनेरिक औषधे लिहून देत नसल्याचे आणि डॉक्टरांच्या वर्तणुकीत नम्रपणा नसल्याच्या होत्या. युथ काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी या समस्या आमदार दीनानाथ पडोळे यांच्या नेतृत्वात अधिष्ठाता डॉ. पोवार यांच्याकडे मांडल्या. यावर अधिष्ठाता यांनी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना रुग्णाशी नम्रपणे वागण्याचे, रुग्णांना बाहेरून औषधे लिहून देताना शक्यतोवर जेनेरिक औषधे लिहून देण्याचे, वैद्यकीय प्रतिनिधींना (एमआरआय) बाह्यरुग्णांच्या वेळात येण्यास बंदी घालण्याच्या सूचना दिल्या. या संदर्भातील लेखी पत्र युथ काँग्रेसच्या शिष्टमंडळालाही दिले. या संदर्भात अधिक माहिती देताना युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष बंटी शेळके म्हणाले, अधिष्ठात्यांनी मागण्या मान्य केल्याने साखळी उपोषण मागे घेतले आहे. परंतु राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत अनेक समस्या आहेत. त्याच्या निराकरणासाठी आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली आहे. या योजनेकडे सार्वजनिक आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित आहेत. (प्रतिनिधी)