शहरं
Join us  
Trending Stories
1
महाग सोन्यामुळे भारताची तिजोरी का रिकामी होत चालली आहे?
2
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
3
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
4
Tata Altroz CNG AMT: ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका, टाटा अल्ट्रोझ सीएनजी ऑटोमॅटिक भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत!
5
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
6
Tata Trusts Row: ३६ वर्षांपूर्वीच्या शेअर ट्रान्सफरवरुन नवा वाद; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांना नोटीस
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
9
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
10
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
11
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
12
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
13
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
14
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
15
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
16
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
17
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
18
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
19
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
20
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
Daily Top 2Weekly Top 5

झुडपी जंगल म्हणायचे का?

By admin | Updated: December 2, 2014 00:37 IST

एकेकाळी सुंदर बगीचा असलेल्या येथील परिसरात सर्वत्र गवत व काटेरी झाडे उगवली असल्याने या परिसराला झुडुपी जंगलाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाऊसाहेबांचा एक सुविचार असलेला स्तंभ

भाऊसाहेबांच्या स्मारकांचे काय होणार ? : महापालिकेने लक्ष घालावे
नागपूर : एकेकाळी सुंदर बगीचा असलेल्या येथील परिसरात सर्वत्र गवत व काटेरी झाडे उगवली असल्याने या परिसराला झुडुपी जंगलाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाऊसाहेबांचा एक सुविचार असलेला स्तंभ उभारण्यात आला आहे. ‘हिंदुस्थानची आजची खरी गरज नि:स्वार्थी व स्वतंत्र बाण्याच्या माणसाची आहे व ही गरज मी काही अंशी जर भरून न काढली तर मी व्यर्थ जन्माला आलो, असे समजेन’ हा विचार कोरण्यात आलेला आहे. परंतु हा स्तंभही झाडाझुडपांमध्ये लपला असल्याने त्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही.
असामाजिक तत्त्वाचा वावर
पुतळा परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने या ठिकाणी सायंकाळनंतर असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. दारू पिणे, जुगार खेळणे आदींसारखी अनेक गैरकृत्ये येथे सर्रास सुरू असतात. याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही.
अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजि. मित्र परिवार राबवणार स्वच्छता मोहीम
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याची ही दुरवस्था पाहून परिसर स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे. उद्या २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ते या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणार आहेत.
आंदोलनाचा इशारा
२७ डिसेंबर रोजी भाऊसाहेबांची जयंती आहे. दरवर्षी जयंतीच्या दोन दिवसांपूर्वी महापालिकेतर्फे पुतळ्याच्या परिसराची थातूर-मातूर स्वच्छता केली जाते. परंतु आता असे चालणार नाही. पुतळ्याची देखभाल करण्याकरिता कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने केली आहे. यासाठी प्रशासनाला २६ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्यास साखळी व आमरण उपोषण आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराचे अध्यक्ष दिलीप मोहीतकर व सचिव प्रणय पराते यांच्यासह भूषण खडसे, अजय तायवाडे, लक्ष्मीकांत पडोळे, डॉ. सहानपुरे, देवेंद्र मते आदींनी दिला आहे.