गावागावात करा डेंग्यूचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:08 AM2021-09-27T04:08:17+5:302021-09-27T04:08:17+5:30

नागपूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे. ...

Do a dengue survey in every village | गावागावात करा डेंग्यूचे सर्वेक्षण

गावागावात करा डेंग्यूचे सर्वेक्षण

Next

नागपूर : शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्याची यंत्रणा अपयशी ठरत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर जि.प. अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी चिंता व्यक्त करीत गावागावात डेंग्यूचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची बैठक अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेत पार पडली. त्यात डेंग्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येवर सदस्यांनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी आरोग्य विभागाला निर्देश दिले. ग्रामीण भागात मंगळवार २१ सप्टेंबर रोजी महिलांसाठी राबविण्यात आलेल्या विशेष लसीकरणात १४ हजार महिलांनी सहभाग नोंदविल्याची माहिती अध्यक्षांनी दिली. तसेच लसीकरणाला गती प्राप्त करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या. ग्रामीण भागातील डेंग्यूची स्थिती नियंत्रणात असल्याचा दावा विभागाने केला आहे. पण शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये डेंग्यूचे रुग्ण जास्त असल्याने, ग्रामीण भागात आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविकांसह डीएमओ डेंग्यूचे सर्वेक्षण करणार आहेत. २७ ते ३० सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ५२ लाख २३ हजार ८६७ लोकसंख्येमधून शासनाने ठरवून दिलेल्या पद्धतीनुसार निवडलेल्या गावातील ६ ते ७ वर्षांच्या मुलांच्या रक्ताद्वारे तपासण्या करण्यात येणार असून यामध्ये रक्त नमुना घेतल्यानंतर १० मिनिटात ते दूषित आहे किंवा नाही, याचे निदान होणार आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संस्थेने नागपूर जिल्ह्यासाठी ८ हजार एफटीएस किट उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली.

Web Title: Do a dengue survey in every village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.