शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मराठा हॉटेल हत्याकांडात डीएनए जुळला

By admin | Updated: July 2, 2014 00:54 IST

हिंगणा एमआयडीसीस्थित ग्रेट मराठा हॉटेल येथील थरारक हत्याकांडात मृताचा व आरोपींच्या कपड्यावरील रक्ताचा डीएनए जुळला आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे

हायकोर्ट : सत्र न्यायालयात अहवाल देण्याचे निर्देशनागपूर : हिंगणा एमआयडीसीस्थित ग्रेट मराठा हॉटेल येथील थरारक हत्याकांडात मृताचा व आरोपींच्या कपड्यावरील रक्ताचा डीएनए जुळला आहे. आरोपींना शिक्षा होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा असल्यामुळे डीएनए अहवाल सत्र न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तपास अधिकाऱ्याला दिले आहेत.प्रकरणातील आरोपी आशिष वीरेंद्र नायडू, राहुल सुशील दुबे व कार्तिक शिवरामकृष्ण तेवर यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज केले आहेत. अर्जावरील सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती एम. एल. तहलियानी यांनी आज, मंगळवारी वरील निर्देश दिले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले असून, रक्त व इतर वस्तूंच्या नमुन्यांचा रासायनिक अहवाल अद्याप मिळाला नव्हता. अहवालामुळे पोलिसांची बाजू बळकट झाली आहे. घटना २०१२ मधील असताना अद्याप रासायनिक अहवाल आला नसल्याची माहिती ऐकून न्यायालय संतापले होते. त्यांनी तपास अधिकाऱ्याला व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त एन. झेड. कुंभरे यांनी न्यायालयात हजेरी लावली. कुंभरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रयोगशाळेने गेल्या एप्रिलमध्ये अहवाल पाठविला होता, पण तो पोलीस ठाण्यात पोहोचला नाही. यामुळे कुंभरे यांनी स्वत: प्रयोगशाळेत जाऊन अहवाल आणला. न्यायालयाने आरोपींच्या वकिलांनाही अहवालाची एकेक प्रत देण्याचे निर्देश दिले आहेत. आरोपींच्या अर्जावरील पुढील सुनावणी ८ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.मंजितसिंग ऊर्फ माँटी गुल्हर असे मृताचे नाव असून तो विठोबानगर, जरीपटका येथील रहिवासी होता. १३ मार्च २०१२ रोजी तो एका मुलीसोबत ग्रेट मराठा हॉटेलमध्ये गेला होता. तेथून सायंकाळी ७.२० च्या सुमारास बाहेर पडल्यानंतर बुरखा घातलेल्या चार आरोपींनी त्याच्यावर बंदुकीच्या दोन गोळ्या झाडल्या. मंजित हॉटेलच्या आत पळाल्यावर आरोपीही त्याच्या मागे गेले. हॉटेलमध्ये आरोपींनी पुन्हा दोन गोळ्या झाडल्या. एक गोळी मंजितच्या पोटात शिरली तर, दुसरी दोन्ही डोळ्यांच्या मधात लागली. तो जागीच ठार झाला. यानंतर आरोपी पळून गेले. मंजितसोबतची मुलगीही नाहीशी झाली. आरोपी नंबर प्लेट नसलेल्या नॅनो कारमधून आले होते.(प्रतिनिधी)