विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचा रणसंग्राम! १२५० अधिकारी-कर्मचारी भिडणार; जिल्हाधिकारी इटनकर मैदानात उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 19:50 IST2026-02-17T19:49:23+5:302026-02-17T19:50:37+5:30

Nagpur : दैनंदिन कामाचा ताण बाजूला सारून प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही विभागीय महसूल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

Divisional Revenue Sports Competition Battle! 1250 officers and employees will compete; District Collector Itankar will enter the field | विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांचा रणसंग्राम! १२५० अधिकारी-कर्मचारी भिडणार; जिल्हाधिकारी इटनकर मैदानात उतरणार

Divisional Revenue Sports Competition Battle! 1250 officers and employees will compete; District Collector Itankar will enter the field

नागपूर: दैनंदिन कामाचा ताण बाजूला सारून प्रशासकीय अधिकाऱ्यांमधील क्रीडा कौशल्याला वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही विभागीय महसूल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २० ते २२ फेब्रुवारी या कालावधीत नागपूर येथे या स्पर्धा पार पडणार असून, यात विभागातील तब्बल १ हजार २५० वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी आपला जोम दाखवणार आहेत.

​७५ खेळांचा समावेश; ५०० महिलांचा सहभाग

या क्रीडा महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कबड्डी, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस यांसारख्या सुमारे ७५ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासनातील महिला शक्तीचाही यात मोठा सहभाग असून, सुमारे ५०० महिला अधिकारी व कर्मचारी विविध मैदानी खेळांमध्ये सहभागी होणार आहेत.

​पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा प्रशासनाने या स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी केली आहे. महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या स्पर्धांचे दिमाखदार उद्घाटन होणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी दिली आहे. नागपूरमधील अद्ययावत सोयीसुविधा असलेल्या विविध क्रीडांगणांवर हे सामने खेळवले जातील.

​VCA च्या मैदानावर रंगणार क्रिकेटचा थरार

या स्पर्धेतील मुख्य आकर्षण म्हणजे क्रिकेटचे सामने. विशेष म्हणजे हे सामने विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (VCA) मैदानावर रंगणार आहेत. नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे स्वतः नागपूर जिल्हाधिकारी कार्यालय क्रिकेट संघातर्फे मैदानात उतरून आपली बॅटिंग आणि बॉलिंगची चमक दाखवणार आहेत. क्रिकेटसाठी एकूण सात संघ रिंगणात असून, यात विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संघाचाही समावेश आहे. प्रशासकीय कामात तत्परता आणि सांघिक भावना वाढीस लागावी, या उद्देशाने आयोजित या स्पर्धेकडे संपूर्ण महसूल विभागाचे लक्ष लागले आहे.

Web Title : विभागीय राजस्व खेल प्रतियोगिता: नागपुर में 1250 अधिकारी प्रतिस्पर्धा करेंगे

Web Summary : नागपुर में 20-22 फरवरी को विभागीय राजस्व खेल प्रतियोगिता आयोजित की जाएगी। वीसीए मैदान पर क्रिकेट सहित 75 खेलों में 1250 अधिकारी प्रतिस्पर्धा करेंगे। कलेक्टर इटणकर भाग लेंगे। मंत्री बावनकुले द्वारा उद्घाटन, यह आयोजन टीम वर्क को बढ़ावा देता है।

Web Title : Divisional Revenue Sports Tournament: 1250 Officials to Compete in Nagpur

Web Summary : Nagpur hosts the Divisional Revenue Sports Tournament from February 20-22. 1250 officials will compete in 75 sports, including cricket at the VCA ground. Collector Itankar will participate. The event, inaugurated by Minister Bawankule, promotes teamwork.

टॅग्स :nagpurनागपूर