शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

भाषेचे वैविध्य हाच भारताचा दागिना

By admin | Updated: June 15, 2014 00:43 IST

मी अनेक भाषातील कलाकृतीत काम केले आहे. वेगवेगळ्या भाषांतील सिनेमात काम केल्यामुळे मलाही वेगवेगळ्या परंपरा, प्रदेश, त्या भाषेचा कस आणि राहणीमान समजून घेता आले. प्रारंभीच्या काळात मी मराठीशिवाय

सोनाली कुळकर्णी : मनमोकळा संवाद
नागपूर : मी अनेक भाषातील कलाकृतीत काम केले आहे. वेगवेगळ्या भाषांतील सिनेमात काम केल्यामुळे मलाही वेगवेगळ्या परंपरा, प्रदेश, त्या भाषेचा कस आणि राहणीमान समजून घेता आले. प्रारंभीच्या काळात मी मराठीशिवाय इतर भाषेत काम करायला लागले तेव्हा माझ्या अनेक सहकलावंतांनी मला मूर्खात काढले. पण त्याला मी बधले नाही.
काम सुरू राहिले आणि आज मला त्याचे समाधान वाटते. वेगवेगळ्या भाषेत काम केल्याने त्या भाषांतील अनेक विषयांना मला भिडता आले, समजून घेता आले. भाषेचे वैविध्य हाच तर भारताचा दागिना आहे. आपण कुठलीही भाषा नाकारली तर आपण आपल्याच भाषेला नाकारत असतो, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुळकर्णीने व्यक्त केले.
‘व्हाईट लिली आणि नाईट रायडर’ या नाटकाच्या प्रयोगासाठी ती नागपुरात आली असताना तिने पत्रकारांशी संवाद साधला. मुळात हे नाटक रसिका जोशी, मिलिंद पाठक यांचे आहे. रसिका जोशी असतानाही मी या नाटकाच्या प्रेमात होते. माझ्या काही मित्रमैत्रिणींनाही हे नाटक पाहण्याचा आग्रह मी धरला. रसिकाने यातील भूमिका जिंवत केली होती. रसिका आता नाही. त्यानंतर मिलिंदने या भूमिकेसाठी मला फोन केला आणि मी तत्काळ होकार कळविला. होकार कळवायला मी बराच वेळ घेते पण या नाटकासाठी मात्र मी तयार झाले. कारण नाटक मला माहीत होते. यात रसिकाने स्वत:ची मुद्रा अंकित केली होती. मला तिच्यासारखे जमणे शक्य नव्हते. हे नाटक रसिकाच्या आठवणींतील असले तरी मला स्वतंत्रपणे या नाटकाकडे पाहावेसे वाटले आणि तेथूनच हे नाटक माझ्यासाठी आव्हान ठरले. रसिकाचा प्रभाव बाजूला ठेवून मी ही भूमिका करते आहे. आता यात मी स्वत:लाच शोधते आहे, असे ती म्हणाली. फेसबुक, सोशल साईट्स यामुळे होणारा गोंधळ, नातेसंबंध याच बाबीवर हे नाटक आधारलेले असल्याने याचा प्रेक्षकवर्ग सर्वच वयोगटाचा आहे. ‘चैत्र’ या लघुपटाचे प्रदर्शनही १४ तारखेला पर्सिस्टंट कंपनीच्या कालिदास सभागृहात सायंकाळी ६ वाजता तिच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे. यात सोनालीने भूमिका केली आहे.
याप्रसंगी या लघुपटाबाबतही तिने माहिती दिली. हा लघुपट जी. ए. कुळकर्णी यांच्या कथेवर आधारलेला आहे. यावेळी कीर्ती रायकर, समीर नाफडे, विष्णू मनोहर उपस्थित होते. (प्रतिनिधी)