शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
2
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
3
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
4
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
5
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
6
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
7
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
8
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
9
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
10
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
11
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
12
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
13
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
14
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
15
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
16
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
17
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
18
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
19
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
20
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
Daily Top 2Weekly Top 5

सुटी झालेल्या रुग्णांचा मेडिकल परिसरातच मुक्काम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 20:48 IST

उपचारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुटी झाली खरी, परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ऑटोरिक्षापासून ते बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न रुग्णांना पडला आहे. यातील सात रुग्ण बुधवारपासून रुग्णालयाच्या आवारातच थांबून होते.

ठळक मुद्देबससेवा बंद झाल्याने घरी जाण्यास अडचण : मेडिकलने घेतली दखल : रुग्णांना परत घेतले वॉर्डात

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपचारानंतर किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुटी झाली खरी, परंतु ‘लॉकडाऊन’मुळे ऑटोरिक्षापासून ते बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न रुग्णांना पडला आहे. यातील सात रुग्ण बुधवारपासून रुग्णालयाच्या आवारातच थांबून होते. मेडिकलच्या सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी या रुग्णांची दखल घेतली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी यांच्या परतीच्या प्रवासाची सोय होईपर्यंत रुग्णालयात पुन्हा भरती करून घेतले. मेडिकलवर ‘कोव्हीड-१९’चा भार असतानाही त्यांनी दाखविलेल्या या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सुरेश सोमकुवर रा. काटोल, उखरडा गवाले रा. बुलडाणा, इमरतसिंग बावरी रा. भिवापूर, गजानन आवळे रा. बुलडाणा व सीमा घरडे रा. गोंदिया असे त्या रुग्णाचे नाव आहे. यातील काहींसोबत नातेवाईकही आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याने डायलिसीससाठी ‘पिस्तुला’ करण्यासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये आले होते. मंगळवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली व बुधवारी सुटी देण्यात आली. गवाले, गजानन व सीमा या तिन्ही रुग्णांच्या डोळ्यावर मेडिकलमध्ये शस्त्रक्रिया झाली. यांनाही बुधवारी सुटी देण्यात आली. इमरतसिंग कर्करोगाचे रुग्ण आहेत. त्यांनाही उपचारानंतर याच दिवशी सुटी देण्यात आली. परंतु ‘ब्लॉकडाऊन’मुळे रेल्वे, बससेवा बंद असल्याने घरी जायचे कसे, हा प्रश्न त्यांना पडला. कालची रात्र त्यांनी मेडिकलच्या परिसरात उघड्यावर काढली. मेडिकलच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गावंडे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यांनी तातडीने या सर्व रुग्णांना भरती करून घेण्याचे निर्देश दिले. परतीच्या प्रवासाची सोय होईपर्यंत आता हे रुग्ण ज्या वॉर्डातून सुटी झाली त्या वॉर्डात भरती राहणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेली ही दखल आणि वैद्यकीय अधीक्षकांनी दिलेल्या या मदतीच्या हाताचे रुग्णांनी आभार मानले. या कार्याचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय