लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या १३ ग्रामपंचातींना निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 08:34 PM2018-08-13T20:34:05+5:302018-08-13T22:46:14+5:30

लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या नागपूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी नाविण्यपूर्ण कामाचा प्रस्ताव आणि ग्रामपंचायतचा ठराव १८ आॅगस्टपूर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिले.

Direction to Lokmat Sarpanch Award winning 13 Gram Panchayats | लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या १३ ग्रामपंचातींना निर्देश

लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या १३ ग्रामपंचातींना निर्देश

Next
ठळक मुद्देनाविण्यपूर्ण कामाचा प्रस्ताव सादर करा : जिल्हा परिषदेत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या नागपूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत हा निधी देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी नाविण्यपूर्ण कामाचा प्रस्ताव आणि ग्रामपंचायतचा ठराव १८ आॅगस्टपूर्वी सादर करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी दिले.
अवॉर्ड विजेत्या १३ ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना याबाबत सूचना देण्यासाठी जिल्हा परिषदेत सोमवारी (दि. १३) बैठक घेण्यात आली. त्यात १३ ही ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. प्रस्ताव हे नाविण्यपूर्ण कामाचेच असावे, असेही यावेळी सांगण्यात आले. हे प्रस्ताव आणि ग्रामपंचायतीचा ठराव जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची २० आॅगस्टला बैठक होणार असून त्यात मंजुरीबाबत निर्णय घेण्यात येईल. मंजुरी मिळताच १३ ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येणार आहे.
या बैठकीला ‘लोकमत सरपंच आॅफ दी इयर’ विजेत्या शीतलवाडी-परसोडा (ता. रामटेक)च्या सरपंच योगिता गायकवाड (सरपंच आॅफ दी इयर) यांच्यासह आष्टीकला (ता. कळमेश्वर) येथील अरुणा डेहणकर, खैरी बिजेवाडा (ता. रामटेक) येथील नंदा मस्के, पाचगाव (ता. उमरेड) येथील पुण्यशीला मेश्राम, वेळा-हरिश्चंद्र (ता. नागपूर) येथील सचिन इंगळे, सावंगी - देवळी (ता. हिंगणा) येथील अनसूया सोनवाणे, सुरादेवी (ता. कामठी) येथील रेखा मानकर, बनपुरी (ता. पारशिवनी) येथील कांता बावनकुळे, गोठणगाव (ता. कुही) येथील कैलास हुडमे, भानेगाव (ता. सावनेर) येथील रवींद्र चिखले, येरखेडा (ता. कामठी) येथील मनीष कारेमोरे, कोदामेंढी (ता. मौदा) येथील प्रतिभा निकुळे, भंडारबोडी (ता. रामटेक) येथील महेंद्र दिवटे हे सरपंच उपस्थित होते.
गत सहा महिन्यांपूर्वी १६ फेब्रुवारी २०१८ लोकमत सरपंच अवॉर्डने १३ ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात आले होते. जलव्यवस्थापन, वीज व्यवस्थापन, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता, आरोग्य, पयाभूत सुविधा, ग्रामरक्षण, पर्यावरण संवर्धन, प्रशासन, ई-प्रशासन, रोजगार निर्मिती, कृषी तंत्रज्ञान आणि उदयोन्मुख नेतृत्व आदी वर्गवारीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वोत्कृष्ट सरपंच तसेच संपूर्ण वर्गवारीत उत्कृष्ट काम करणाºया सरपंचाला ‘सरपंच आॅफ द इयर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्या पुरस्कार वितरण समारंभप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.

ही आहेत नावीन्यपूर्ण कामे
लोकमत सरपंच अवॉर्ड विजेत्या १३ ही ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जिल्हा परिषदेने एक परिपत्रक दिले. त्यात नावीन्यपूर्ण ३३ कामे दिलेली आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर्स खरेदी करणे, अपंगांना सहाय्यक उपकरणे खरेदीसाठी अर्थसाहाय्य, राष्ट्रीय  छात्रसेना कार्यालय इमारत बांधकाम, शासकीय धान्य गोदाम येथे आवार भिंतीचे बांधकाम करणे, जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करणे, ग्रामीण भागातील जनतेकरिता इंटरनेट संपर्क यंत्रणा उभारणे, अनाथ मुलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकामार्फत मार्गदर्शन व इतर अनुषंगिक खर्च, लेक वाचवा अभियान, चिपड जमीन सुधारणा, कृषी विकास परिषद, प्राथमिक शाळांना बेंचेस पुरविणे, निष्कासित उष्णतेवर आधारित वॉटर हिटर निर्मिती, खारफुटी जंगलाचे संवर्धन, महिला बचत गट योजनेसाठी इमारत बांधणे, गावांचा झोन प्लॅन तयार करण्यासाठी उपग्रहांच्या माध्यमातून प्राप्त नकाशांच्या आधारे सर्वेक्षण करणे, प्रयोगशाळा बळकटीकरण करणे, सामान्य नागरिकांना सार्वजनिक शौचालय सुविधा देणे, शासकीय कार्यालयात सौरऊर्जा पद्धतीचा विकास करणे, बायोमेट्रिक हजेरी सुविधा सुरू करणे, साहसी खेळांचे आयोजन, पारधी पुनर्वसन-व्यवसाय प्रशिक्षण, अवकाश निरीक्षण, टंचाईच्या कालावधीत नवीन टँकर्स विहित पद्धतीने खरेदी करणे आदी ३३ नावीन्यपूर्ण कामांचा समावेश आहे. 

Web Title: Direction to Lokmat Sarpanch Award winning 13 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.