शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

नागपुरातील प्रतापनगरात हिरे-सोन्याचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 9:00 PM

प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीनदयालनगरात राहणाऱ्या अलका उदय नायक (वय ५५) यांच्या घरातून हिरे तसेच सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार त्यांनी बुधवारी दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देधाडसी चोरी : तीन आठवड्यानंतर तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दीनदयालनगरात राहणाऱ्या अलका उदय नायक (वय ५५) यांच्या घरातून हिरे तसेच सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. तीन आठवड्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार त्यांनी बुधवारी दिल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.नायक यांचे फ्रेण्डस सोसायटीत निवासस्थान आहे. २३ एप्रिल ते ४ मे दरम्यान त्यांच्या नातेवाईकांकडे कार्यक्रम होता. त्यामुळे त्या तिकडेच व्यस्त होत्या. या कालावधीत त्यांच्याकडचे हिऱ्याचे तसेच सोन्याचे दागिने चोरीला गेले. ही घटना लक्षात आल्यानंतर अलका नायक यांनी आपल्या नातेवाईक तसेच घरातील नोकरांना याबाबत विचारणा केली. कुणीच काही माहिती दिली नसल्यामुळे अखेर बुधवारी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत ४ लाख, ३६ हजार रुपये आहे. हे दागिने ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून होते. विशेष म्हणजे, उपरोक्त कालावधीत त्यांच्याकडे पाहुण्यांची वर्दळ होती. त्यामुळे दागिने त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांपैकी कुणी चोरले की घरात काम करणाऱ्या नोकराने ते लंपास केले, हे कळायला मार्ग नाही. नायक यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगरचे एएसआय शेषराव कामडी यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. चोरट्याचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :theftचोरीnagpurनागपूर