शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
2
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
3
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
5
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
6
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
7
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
8
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
9
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
10
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
11
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
12
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
13
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
14
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
15
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
16
NEET Exam Paper Leak: 'नीट’ पेपरफुटी प्रकरणात पुण्यातील प्राध्यापक मनीषा मांढरे अटकेत; सीबीआयकडून कारवाई
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
IPL फायनल दरम्यान PCB अध्यक्ष मोहसिन नक्वी भारतात येणार? जाणून घ्या ही चर्चा रंगण्यामागचं कारण
19
"तो युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर उपकार!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' विधानाने जागतिक राजकारणात खळबळ
20
भयंकर! निळ्यानंतर आता 'हिरव्या ड्रम'ची दहशत; पतीसोबत मिळून पत्नीने केली प्रियकराची हत्या
Daily Top 2Weekly Top 5

धोक्याचा कोराडी रोड

By admin | Updated: May 28, 2014 01:02 IST

कोराडी रोड हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या या महामार्गाच्या चार पदरीचे काम सुरू आहे. यातच उड्डाणपुलाचेही काम जोरात सुरू असल्याने पागलखाना चौक ते कोराडी पॉवर

ओव्हरलोड वाहनांमुळे वाढले अपघात : बांधकामामुळे रस्ता अरुंद

नागपूर : कोराडी रोड हा राष्ट्रीय महामार्ग आहे. सध्या या महामार्गाच्या चार पदरीचे काम सुरू आहे. यातच उड्डाणपुलाचेही काम जोरात सुरू असल्याने पागलखाना चौक ते कोराडी पॉवर प्लांटपर्यंंत दोन्ही मार्गावरील रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. असे असतानाही या रोडवरून ऑटो, जीप, ट्रॅक्स व इतर प्रवासी वाहने ‘ओव्हलोड’ प्रवाशांसह भरधाव वेगात सर्रास धावत आहेत. या प्रवासी वाहनांची हीच गती प्रवाशांसाठी मात्र जीवघेणी ठरत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे रविवारी कोराडी विद्युत विहार गेटसमोर घडलेला अपघात होय.

भरधाव वेगाने येत असलेल्या जीप चालकांचे नियंत्रण वाहनावरून सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत पाच मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर तीन गंभीर जखमी आहेत. कोरडी रोडच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असल्याने दोन्ही बाजूने रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. अशा परिस्थितीतही वाहनांची गती मात्र कमी करायला कुणी तयार नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु या सर्व गोष्टींची जाणीव असूनही आरटीओ विभागातर्फे मात्र कुठलीही कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे. कोराडी रोडवरून सदर, बर्डीमार्गे कोराडी व खापरखेड्यापर्यंंत सहा सीटर वाहने चालतात. सहा सीटर वाहने असूनही १२ ते १४ प्रवासी बसविले जातात. तसेच टेकडी रोड सीताबर्डी आणि एलआयसी चौकातील कस्तुरचंद पार्कजवळून सौंसर आणि छिंदवाड्यासाठी सवारी जीप चालते. या वाहनांमध्ये १५ ते १६ प्रवासी जनावरांप्रमाणे भरले जातात.

तसेच जीप चालकाच्या सीटला लागून चार ते पाच प्रवासी आणखी बसवून भरधाव वेगाने ही वाहने चालविली जात आहेत. ही वाहने शहरातील मॉरिस कॉलेज टी पॉईंट, संविधान चौक, एलआयसी चौक, रेसिडेन्सी चौक सदर, अंजुमन कॉलेज चौक, छावणी आणि मानकापूर चौकातून जातात; तरीही या वाहनांवर वाहतुक पोलिसांकडून कुठलीही कारवाई का होत नाही, हा प्रश्नच आहे. (प्रतिनिधी)

मानकापूर नेहमीच जाम

कोराडी रोडवरील सर्वात व्यस्त असलेला मानकापूर चौक दुचाकी वाहनचालकांसाठी सर्वाधिक धोकायदाय झाला आहे. या चौकातून नारा रिंग रोड ते गोरेवाडा, वाडी नाकाकडे जाणार्‍या जड वाहनांची नेहमीच वर्दळ असते. तर बर्डी, सदर आणि इतर मार्गाकडून कोराडी, खापरखेडा मार्गावरील वस्त्यांमध्ये राहणार्‍या नागरिकांची ये-जा मोठय़ा प्रमाणवर असते. चौकातच उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने येथील वाहतूक नियंत्रित ठेवणे अतिशय कठीण झाले आहे. अशा परिस्थितीतही येथे केवळ एक किंवा दोन वाहतूक पोलीसच कार्यरत असतात. त्यांची नजर चुकली की भरधाव वेगाने येणारे चालक नियमाची पायमल्ली करतात. या रोडवर सकाळी ९.३0 ते सायंकाळी ५.३0 नंतर वाहतुकीची परिस्थिती अतिशय बिकट असते. यानंतर तासन्तास जाम असतो.

कोराडी नाक्यावर जड वाहनांची गर्दी

कोराडी नाक्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला ट्रक, टिप्पर आणि जड वाहने पार्क केली जातात. रस्त्यावरून जाणार्‍या वाहनचालकांना दिवसा ही जड वाहने दिसतात. परंतु रात्रीच्या वेळी मात्र यापैकी बहुतांश वाहनांवर स्टिकर नसल्याने आणि पार्किंंग लाईट सुरू नसल्याने दिसत नाहीत. अशा स्थितीत भरधाव वेगाने येणारी वाहने उभ्या असलेल्या जड वाहनांवर धडकतात. रविवारीसुद्धा असेच घडले. भरधाव वेगाने येत असलेल्या जीपचालकाला विद्युत विहार समोर पंक्चर झालेला ट्रक दिसला नाही. त्यामुळे जीप ट्रकवर आदळली.