धर्मपाल मेश्राम यांनी विधी समितीची सूत्रे स्वीकारली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 11:11 PM2018-03-26T23:11:56+5:302018-03-26T23:12:12+5:30

महापालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्यात सोमवारी अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी विधी समितीच्या सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली.

Dharmapal Meshram accepted the legal committee's charge | धर्मपाल मेश्राम यांनी विधी समितीची सूत्रे स्वीकारली 

धर्मपाल मेश्राम यांनी विधी समितीची सूत्रे स्वीकारली 

Next
ठळक मुद्दे स्वतंत्र ५० लाख रुपयांची तरतूद करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित पदग्रहण सोहळ्यात सोमवारी अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी विधी समितीच्या सभापतिपदाची सूत्रे स्वीकारली.
यावेळी आमदार कृष्णा खोपडे, भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर,शहर संघटन मंत्री भोजराज डुंबे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, जलप्रदाय समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, विधी समितीच्या उपसभापती संगीता गिºहे, सदस्य जयश्री वाडीभस्मे, अमर बागडे, समिता चकोले, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, प्रतोद दिव्या धुरडे, सभापती अ‍ॅड. मिनाक्षी तेलगोटे आदी उपस्थित होते.
धर्मपाल मेश्राम विधी समितीचा कार्यभार यशस्वीपणे पार पाडतील असा विश्वास कृष्णा खोपडे यांनी यावेळी व्यक्त केला. संदीप जोशी म्हणाले, विधी समितीचे कार्य सभापती म्हणून सांभाळणे हे एक मोठे आव्हान आहे. या समितीसाठी स्वतंत्र ५० लाख रुपयांची तरतूद करण्याची गरज आहे. धर्मपाल मेश्राम यांनी पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरविण्याची ग्वाही दिली.

Web Title: Dharmapal Meshram accepted the legal committee's charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.