शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

राजीनामा बळजबरीने घेतल्याचा धनंजय कुलकर्णी यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

नागपूर : वर्तमान राज्य सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल अध्यक्षपदाचा राजीनामा बळजबरीने घेण्यात आला असा आरोप धनंजय कुलकर्णी यांनी ...

नागपूर : वर्तमान राज्य सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल अध्यक्षपदाचा राजीनामा बळजबरीने घेण्यात आला असा आरोप धनंजय कुलकर्णी यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने बुधवारी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव, महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलचे कुलसचिव, उपाध्यक्ष उमेशचंद्र सोनार, सदस्य कुमार पाटील, शहाजी माने व राजाभाऊ गरुड यांना नोटीस बजावून यावर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. तत्कालीन सरकारने १८ ऑक्टोबर २०१७ रोजी कुलकर्णी यांची महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिलच्या अध्यक्षपदी पाच वर्षाकरिता नियुक्ती केली होती. असे असताना ५ मार्च २०२१ रोजी झालेल्या बैठकीत कुलसचिव व इतर काही सदस्यांनी कुलकर्णी यांना बळजबरीने राजीनामा मागून घेतला. त्यानंतर बैठकीचे अवैध इतिवृत्त तयार केले. त्या इतिवृत्तावर कुलकर्णी यांनी स्वाक्षरी केली नाही. दरम्यान, कुलकर्णी यांनी ९ मार्च २०२१ रोजी राजीनामा मागे घेतला होता. असे असताना वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिवांनी ३१ मे २०२१ रोजी राजीनामा स्वीकारण्याचा आदेश जारी केला. त्यांनी राजीनामा मंजूर करताना कुलकर्णी यांना सुनावणीची संधी दिली नाही. तसेच, कुलकर्णी यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याची पुष्टी करून घेतली नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. कुलकर्णी यांच्यावतीने ॲड. तुषार मंडलेकर व ॲड. रोहण मालविया यांनी कामकाज पाहिले.