शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विकास महत्त्वाचा पण पर्यावरणाचा बळी घेऊन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST

मेहा शर्मा नागपूर : अजनी येथे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी हाेणाऱ्या वृक्षताेडीविराेधात माेठे आंदाेलन पेटले आहे. याचवेळी शहरातील ...

मेहा शर्मा

नागपूर : अजनी येथे प्रस्तावित इंटर माॅडेल स्टेशन प्रकल्पासाठी हाेणाऱ्या वृक्षताेडीविराेधात माेठे आंदाेलन पेटले आहे. याचवेळी शहरातील राजकीय क्षेत्रातील एका समूहाने पर्यावरणाऐवजी विकासाला पूरक भूमिका घेतली आहे. नुकतेच माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत महापाैर दयाशंकर तिवारी यांनी झाडांना महत्त्व देण्यापेक्षा आयएमएस प्रकल्प हाेणे शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. यावर लाेकमतने शहरातील काही मान्यवरांच्या भूमिका जाणून घेतल्या.

विकासासाेबत पर्यावरण संवर्धन आवश्यक : अभिजित वंजारी

आमदार अॅड. अभिजित वंजारी यांनी विकास साधताना पर्यावरण संरक्षणाचेही महत्त्व अधाेरेखित केले. विकासकामे करताना झाडांचा बळी जाताे. मात्र याचवेळी पर्यावरणवाद्यांच्या मागण्याही लक्षात घेणे आवश्यक आहे. अजनी वनाच्या प्रकरणात प्रकल्प कंत्राटदाराने ही बाब गंभीरतेने लक्षात घ्यावी आणि पर्यावरण विभागाकडून एनओसी मिळाल्यानंतरच प्रकल्पाचे काम पुढे न्यावे. शहरात अनेक जागा रिकाम्या आहेत. अजनी ते रहाटे काॅलनीपर्यंत माेठी जागा पडित आहे. सरकार, महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अजनीवनाचा पर्याय म्हणून या जागेची निवड करावी, असे मत त्यांनी व्यक्त केले. झाडे पुनर्राेपित करता येणे अशक्य आहे. अजनी परिसरातच वृक्षाराेपण करण्याला प्राधान्य द्यावे. विकास आणि पर्यावरण या दाेन्हीकडे लक्ष केंद्रित करून निर्णय घ्यावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

आयएमएस आवश्यक, पर्यावरणाचा बाऊ नकाे : गिरीश गांधी

वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी यांनी, आयएमएस प्रकल्प आवश्यक असून पर्यावरणाच्या नावाने नाहक बाऊ केला जात असल्याची टीका केली. वृक्षताेडीला आपलाही विराेध असल्याचे ते म्हणाले. मात्र काही प्रकल्प हे शहरातील नागरिकांच्या फायद्याचे असतात व अशा प्रकल्पांना विराेध करणे अयाेग्य असल्याचे ते म्हणाले. भरतवनच्या वेळी आम्ही वृक्षताेडीला विराेध केला कारण हा प्रकल्प शहराच्या साैंदर्यीकरणासाठी हाेता. मात्र आयएमएस प्रकल्प नागपूरच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे आणि ताे व्हायलाच हवा, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.

झाडे न कापता विकास शक्य : विकास ठाकरे

नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त आमदार विकास ठाकरे म्हणाले, विकास आवश्यक आहे पण झाडे न ताेडता करता येताे का तेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. अजनी वनाच्या विषयावर पालकमंत्र्यांनी सत्ताधारी व विराेधी पक्ष यांच्याशी चर्चा करावी. याबाबत पालकमंत्र्यांना पत्र दिल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाने वेगवेगळा विचार मांडला तर या समस्येवर उपाय काढता येणार नाही. या समस्येवर उत्तर शाेधणे गरजेचे आहे. अजनी वन हा केवळ एक विषय नाही. अंबाझरी उद्यान व बाॅटनिकल गार्डनमधील वृक्षताेड व झाडे जाळण्याचा विषय गंभीर आहे. सरकार खाजगी कंपन्यांच्या हाती साेपवून पर्यावरणाचे अताेनात नुकसान करीत आहे.