शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

शेगावच्या आनंदसागरच्या धर्तीवर होणारा नागपुरातील अंबाझरीचा विकास बारगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:17 IST

शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ४२.४२ एकर जागा दिली होती. महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे तूर्त हा प्रकल्प बारगळला असल्याने प्रकल्पासाठी दिलेली जागा महापालिका परत घेणार आहे.

ठळक मुद्देमनपा पर्यटन विकास महामंडळाकडून ४२.४२ एकर जागा परत घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास करण्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला ४२.४२ एकर जागा दिली होती. महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार होता. परंतु गेल्या साडेतीन वर्षात महामंडळाने प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने कोणत्याही स्वरुपाचा पुढाकार घेतलेला नाही. महामंडळाच्या उदासीन कारभारामुळे तूर्त हा प्रकल्प बारगळला असल्याने प्रकल्पासाठी दिलेली जागा महापालिका परत घेणार आहे.मौजा अंबाझरी येथील अंबाझरी तलावाजवळील खसरा क्र. १ मधील ४४ एकर क्षेत्र शासकीय असून यापैकी उद्यानाचे उत्तरेकडील १९ एकर क्षेत्र महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विकसित करण्यास व उर्वरित २५ एकर क्षेत्र महापालिका विकसित करणार होती.अंबाझरी तलाव व उद्यान परिसराला पर्यटन स्थळाचे स्वरुप प्राप्त होणार होते. या प्रकल्पातून प्राप्त नफ्यातील ७५ टक्के रक्कम महापालिकेला तर २५ टक्के पर्यटन विकास महामंडळाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या प्रस्तावाला महापालिका सभागृहात ६ आॅक्टोबर २०१५ रोजी मंजुरी देण्यात आली होती. महापालिकेने कोणताही मोबदला न घेता महामंडळाला प्रकल्पासाठी ४२.४२ एकर जागा उपलब्ध केली होती. शेगाव येथील आनंदसागरच्या धर्तीवर अंबाझरी तलाव व उद्यानाचा विकास केला जाणार होता. येथे बोटिंग सुविधा, मनोरंजनाची साधने, तसेच तलाव व उद्यानाचे सौंदर्यीकरण केले जाणार होते. यातून महापालिकेच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र पर्यटन विकास महामंडळाने गेल्या साडेतीन वर्षात अंबाझरीचा कोणत्याही स्वरुपाचा विकास केलेला नाही. यामुळे ही जागा महापालिका परत घेणार आहे. ३० नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.नगरविकास राज्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासनअंबाझरी तलाव व उद्यानाचा गांधीसागरच्या धर्तीवर विकास व्हावा, यासाठी समिती गठित करण्यात येईल. प्रकल्पासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिले होते. परंतु आश्वासनानुसार हा प्रकल्प राबविण्यात आला नाही.

टॅग्स :Anand Sagarआनंदसागर