शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

स्फोटाच्या आरोपीला कोठडी

By admin | Updated: May 28, 2017 02:06 IST

सदर पोलीस ठाण्यात शुक्रवारी भरदुपारी स्फोट घडवून खळबळ उडवून देणारा आरोपी मुकेश गोरेलाल अंभोरे

सदर पोलीस ठाण्यातील प्रकरण : कोठडीतही केला उपद्रव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सदर पोलीस ठाण्यात शुक्रवारी भरदुपारी स्फोट घडवून खळबळ उडवून देणारा आरोपी मुकेश गोरेलाल अंभोरे (वय ५९) याला कोर्टाने २८ मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, त्याला अटक केल्यापासून त्याने पोलीस ठाण्यात (कोठडीच्या गजाआड) उपद्रव चालविला आहे. मोठमोठ्याने आरडाओरड करणे, शिवीगाळ करणे, डोके आपटणे, पोलिसांना आव्हान देणे असे प्रकार करून त्याने पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त उपराजधानीत शनिवारी देशभरातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची मांदियाळी जमणार असताना शुक्रवारी दुपारी चक्क पोलीस ठाण्यात स्फोटाची घटना घडल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली होती. उलटसुलट चर्चेला उधाणही आले होते. मात्र, स्फोट घडवून आणणाऱ्या आरोपीने स्वत:चे नाव चिठ्ठीत लिहून ठेवल्याने अवघ्या दोन तासातच पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी मुकेश अंभोरे हा जुना पारडी नाका नेताजीनगर, कळमना येथील रहिवासी आहे. त्याने बॉम्बसदृश वस्तू तयार करून सदर पोलीस ठाण्याच्या कुंपण भिंतीलगत शुक्रवारी दुपारी स्फोट घडवून आणत येथे कार्यरत कर्मचारी आणि आजूबाजूचे नागरिक यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे शासकीय कामात अडथळा निर्माण केला, असा आरोप ठेवून पोलिसांनी अंभोरेविरुद्ध कलम ३८६, ३०७, ३५३, ३३६ भादंवि तसेच सहकलम ३, ४ भारतीय स्फोटक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला आहे. त्याला अटक करून कोर्टात हजर केल्यानंतर त्याचा २८ मे पर्यंत पीसीआर मिळवला. सध्या तो कोठडीत आहे. मात्र, त्याने ठाण्यातील पोलिसांच्या नाकीनऊ आणले आहे. गोंधळ घालून शांत झाल्यानंतर काही वेळाने तो भ्रष्ट व्यवस्थेवर भाष्य करून पोलिसांचा लक्षवेध करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या या वर्तनामुळे पोलिसांना हसावे की रडावे, असे झाले आहे. असा बनविला बॉम्ब बॉम्बसदृश वस्तू बनवून स्फोट घडवून आणणारा अंभोरे व्यसनाधीन आणि मानसिक रुग्ण असल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, एक व्यसनाधीन आणि मानसिक रुग्ण बॉम्बसदृश घातक वस्तू कशी बनवू शकतो, त्याचे कोडे उलगडलेले नाही. अंभोरेने सदर ठाण्यात शुक्रवारी ज्या पाईप बॉम्बचा स्फोट घडवून आणला तो बनविण्यासाठी त्याने प्लास्टिकची बाटली, लोखंडी तारांचे तुकडे, अर्धा इंच रुंद आणि चार इंच लांबीची लोखंडी पट्टी, पाण्याच्या पाईपलाईनमध्ये वापरले जाणारे नोझल आणि फटाक्यात वापरली जाणारी बारुद आदीचा वापर केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा स्फोट जोरदार होता अन् त्याचा आवाज अर्धा किलोमीटर अंतरावर ऐकू आला होता. आरोपी व्यसनाधीन, मनोरुगण ! आरोपी अंभोरे हा कुटुंब कलहामुळे मानसिक रुग्ण बनला आहे, असे पोलीस सांगतात. मानसिक अवस्था बिघडल्याने तो व्यसनाधीन झाला असून, त्याने यापूर्वीही अनेक गुन्हे केले आहे. तो मीठा निम दर्गाह परिसरात भटकताना दिसतो. या ठिकाणी मिळेल ते खाऊन याच भागात तो राहतो. सदर पोलीस ठाण्यात स्फोट घडवून आणण्यापूर्वी त्याने जिल्हा न्यायालयाच्या बार रूममध्ये एका वकिलाच्या टेबलखाली अशाच प्रकारे स्फोट घडवून आणला होता. त्याचाही गुन्हा सदर पोलीस ठाण्यातच दाखल झाला होता. त्यावेळी सदर पोलिसांकडून त्याला जी वर्तणूक मिळाली, त्याचा बदला घेण्यासाठी त्याने पोलीस ठाण्यात हा स्फोट घडवून आणल्याचा अंदाज बांधला जातो. मात्र, त्याने स्फोटापूर्वी लिहून ठेवलेल्या दोन चिठ्ठ्यांमध्ये महिलांविषयक गुन्ह्याबाबत निर्माण झालेले कायदे जाचक आहेत, त्यात दुरुस्ती व्हावी आणि आश्रमशाळांमधील गैरप्रकारांत गुंतलेल्या दोषींवर पाहिजे तशी कारवाई झाली नसल्याने सरकार व पोलिसांचे लक्ष वेधण्यासाठी हा गुन्हा केल्याचे त्याने चिठ्ठीत लिहिले आहे. यापूर्वीही अनेक गुन्हे त्याच्यावर यापूर्वी धंतोली पोलीस ठाण्यात २००४ मध्ये हल्ला करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. हाच गुन्हा पुन्हा २००५ मध्ये प्रतापनगर ठाण्यात दाखल झाला. ३० डिसेंबर २००७ मध्ये उच्च न्यायालय परिसरात त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर सदर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१२ मध्ये दारूबंदी कायद्यानुसार तर २०१३ मध्ये त्याच्यावर अजनी ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. व्यसन भागविण्यासाठी त्याने अजनीतील एका खांबावर चढून सोलर सिस्टिमची १२ व्होल्टची बॅटरी चोरली होती.