शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

विजेच्या पायाभूत विकास योजनेस उशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 13:31 IST

सन २०१३ मध्ये वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत विकासासाठी सुरू करण्यात आलेली इंफ्रो-२ योजना निर्धारित वेळेत म्हणजे मार्च २०१८ मध्ये पूर्ण होऊ शकली नाही. राज्य सरकारने योजनेची परिस्थिती पाहता याची मुदत मार्च २०१९ पर्यंत वाढविली आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने मुदत वाढवली ३६५ कोटी मंजूर, २५५ कोटी दिले

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सन २०१३ मध्ये वीज वितरण यंत्रणेच्या पायाभूत विकासासाठी सुरू करण्यात आलेली इंफ्रो-२ योजना निर्धारित वेळेत म्हणजे मार्च २०१८ मध्ये पूर्ण होऊ शकली नाही. राज्य सरकारने योजनेची परिस्थिती पाहता याची मुदत मार्च २०१९ पर्यंत वाढविली आहे. आता वाढलेल्या कालावधीत काम पूर्ण करण्याची जबाबदारी महावितरणची आहे.एकूण ८३०४ कोटी रुपयाची ही योजना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी शासनाने सुरू केली होती. एकूण निधीच्या ८० टक्के रक्कम आरईसीच्या माध्यमातून कर्ज घेण्यात आले होते. तर २० टक्के म्हणजे १०६१ कोटी रुपये राज्य सरकारला द्यावयाचे होते.राज्य सरकारने आपल्या हिश्श्याच्या निधीपैकी यंदाच्या अर्थसंकल्पात ३६५.५५ कोटी रुपये मंजूर केले आहे.यापैकी २४ आॅगस्टपर्यंत २५५.८९ कोटी रुपये जारी करण्यात आलेले आहे. हे सर्व या योजनेचा निर्धारित कालावधी मार्च २०१८ नंतर झाले. दरम्यान राज्य सरकराने योजनेची उपयोगीता लक्षात घेता याचा कलावधी वाढवून दिला.या योजनेंर्गत पूर्ण राज्यात नवीन सबस्टेशन बनवण्यात येत आहे. याशिवाय ट्रान्सफॉर्मरच्या संख्येत वाढ करून वीज लाईनचे जाळे वाढवण्यास प्राथमिकता दिली जात आहे. याचा उद्देश विजेची वाढती मागणी पूर्ण करणे, तांत्रिक त्रुटीमुळे वीज पुरवठा बाधित होण्यापासून रोखणे आणि नवीन वीज कनेक्शन विनाविलंब उपलब्ध करून देणे आहे.

५१० सबस्टेशन बनवायचे होते, ४७९ बनलेही योजना संथगतीने सुरू आहे. आवश्यक निधी नसल्याने कामाची गती कमी आहे. या दरम्यान अनेक ठेकेदरांवर कारवाईसुद्धा करण्यात आली, परंतु कहीही फायदा झाला नाही. योनेंतर्गत राज्यभरात ५१० सब स्टेशन बनवायचे होते. परंतु आतापर्यंत केवळ ४७९ सब स्टेशनच होऊ शकले. त्याचप्रकारे नवीन ट्रान्सफॉर्मर लवणे आणि जुने ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवण्याचे कामही पूर्ण होऊ शकलेले नाही.

नागपूर झोनमध्येही काम अपूर्णचनागपूर आणि वर्धा जिल्हा मिळून असलेले नागपूर झोनमध्ये इंफ्रा-२ चे काम इतर झोनच्या तुलनेत व्यवस्थित आहे. परंतु या झोनमध्येही काम पूर्ण होऊ शकलेले नाही. महावितरणने आॅगस्टमध्ये तयार केलेल्या अहवालात ही बाब मान्यही केली आहे. त्यांच्यानुसार ४९२ ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवायची होती. परंतु पाच वर्षात आठ ट्रान्सफॉर्मर अजूनही प्रतीक्षा करीत आहे. त्याचप्रकारे १३७१ नवीन ट्रान्सफॉर्मर लावण्यात येणार होते. आतापर्यंत ११७५ ट्रान्सफॉर्मरच लावण्यात आलेले आहे.

टॅग्स :electricityवीज