शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा म्हणजे लाँगमार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:32 IST

लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली.

ठळक मुद्देवक्त्यांचा सूर : लाँगमार्च जिंदाबाद पुस्तकाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाँगमार्चला स्वाभिमानाचा आधार होता म्हणूनच या आंदोलनाने इतिहास घडविला. आंबेडकरी समाजात नव्याने उदंड आत्मविश्वास जागविला. दुर्दम्य आशावाद व सातत्याने लढण्याची प्रेरणा लाँगमार्चने दिली.सामाजिक ऐक्याची संधी उपलब्ध करून दिली. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा हे लाँगमार्चच्या आंदोलनाचे देदीप्यमान वैशिष्ट्य ठरले. नामांतराचा लढा हा आंबेडकरी समाजाच्या स्वत्वसिद्धीचाच लढा होता, असा सूर उपस्थित वक्त्यांनी काढला.निमित्त होते ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तक प्रकाशनाचे. मंगळवारी सीताबर्डी येथील नेताजी मार्केट येथील रिपब्लिकन मुव्हमेंट कार्यालयात हा सोहळा आंबेडकरी विचारवंत ताराचंद खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून थॉमस कांबळे, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, पुस्तकाचे लेखक इ.मो. नारनवरे, गीता नारनवरे, अ‍ॅड. सुरेश घाटे व प्रकाशक नरेश वाहाणे उपस्थित होते. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ या पुस्तकावर भाष्य करताना डॉ. चोरमारे म्हणाले, इ.मो. नारनवरे यांनी आपल्या पुस्तकात कल्पनेला कुठलाही वाव दिला नाही. नामांतराचे वास्तववादी दर्शन या पुस्तकातून घडते.अंगावर शहारे आणणारे, माणसाला अंतर्मुख करणारे असे अनेक संदर्भ या पुस्तकात आहे. ‘लाँगमार्च जिंदाबाद’ म्हणजे परिश्रमाचे, त्यागाचे, लढाऊपणाचे व नि:स्वार्थपणाचे जिवंत चित्रण आहे.बुरशी लागलेल्या पोळ्या, नाल्याचे पाणी‘लाँगमार्च’च्या आठवणींना उजाळा देत थॉमस कांबळे म्हणाले, ११ नोव्हेंबर १९७१ रोजी पवित्र दीक्षाभूमीची माती कपाळी लावून प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या नेतृत्वात लाँगमार्च निघाला तेव्हा मराठवाडा विद्यापीठास ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळालेच पाहिजे’ हा एकच ध्यास होता. माझ्यासह अनेक भीमसैनिक पाऊस, चिखल तुडवित चालत होते, सहभागी होत होते. बुरशी लागलेली भाकर, नाल्याचे पाणीही त्यावेळी गोड लागले. ध्येयाप्रति समर्पणनिष्ठा या एकाच भूमिकेत सर्व जण होते.‘लाँगमार्च जिंदाबाद’ पुस्तक नव्हे इतिहासडॉ. आगलावे म्हणाले, ‘लाँगमार्च’ हे अस्मितेचे, स्वाभिमानाचे आंदोलन होते. या आंदोलनावर पहिले पुस्तक दिल्लीच्या विजय ढेंबरे यांनी लिहिले. परंतु ते पुस्तक प्रकाशित झाले नाही. इ.मो. नारनवरे यांनी लिहिलेले ‘लाँगमार्च जिंदाबाद’ हे पुस्तक नव्हे तर तो त्यांनी लिहिलेला इतिहास आहे. या आंदोलनाला स्वाभिमानाची किनार होती म्हणूनच ते ऐतिहासिक ठरले.‘लाँगमार्च’ची विचारवंतांनी दखल घेतली नाहीअध्यक्षस्थानावरून बोलताना खांडेकर म्हणाले, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक स्तरावर लाँगमार्च आंदोलन झाले. जोगेंद्र कवाडे हे या आंदोलनाचे प्रतीक होते. सम्यक क्रांतीच्या विचारांना घेऊन लढा लढविण्यात आला होता. यात ‘जयभीम’ साप्ताहिकाचे कार्य महत्त्वपूर्ण राहिले. मात्र, या ऐतिहासिक लढ्याची येथील विचारवंतांनी दखल घेतली नाही, ही खंत आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र शेलार यांनी केले. संचालन भीमराव वैद्य यांनी तर आभार नरेश वाहाणे यांनी मानले.लाँगमार्चमधील निर्धार आता दिसून येत नाहीलेखक नारनवरे म्हणाले, ‘लाँगमार्च’ मी जगलो. यामुळे लाँगमार्चमध्ये सहभागी तमाम भीमसैनिकांप्रति अपार श्रद्धा अंतकरणात आहे. या आंदोलनाने अनेक पिढ्यांना जिवंत केले. भीमसैनिकांची परीक्षा पाहणारे असे हे आंदोलन होते. आप्त-परकीय ठरविण्याचे भान या लाँगमार्चने दिले. परंतु लाँगमार्चमधील तो निर्धार, आंबेडकरी समाजातील तो उदंड आत्मविश्वास नंतर कुठल्याच आंदोलनात दिसून येत नाही, ही खंत आहे, असेही ते म्हणाले.