शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्धच्या निर्णयावर पुनर्विचार होणार : सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 9:56 PM

अ‍ॅड. सतीश उके यांच्या फौजदारी प्रकरणात दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देसतीश उके यांचे फौजदारी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅड. सतीश उके यांच्या फौजदारी प्रकरणात दिलेल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे फडणवीस यांना दिलासा मिळाला आहे.२०१४ मधील विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशनपत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन न्यायप्रविष्ट फौजदारी प्रकरणे लपवून ठेवल्यामुळे फडणवीस यांच्यावर लोक प्रतिनिधीत्व कायद्यातील कलम १२५-ए अंतर्गत कारवाई करण्यात यावी असे उके यांचे म्हणणे आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे फडणवीस यांच्या बाजूने देण्यात आलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने १ आॅक्टोबर २०१९ रोजी रद्द केला होता. त्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय पुनर्विचार करणार आहे. न्या. अरुण मिश्रा, न्या. दीपक गुप्ता व न्या. अनिरुद्ध बोस यांनी फडणवीस यांचा यासंदर्भातील अर्ज मंजूर केला.फडणवीस यांच्यावर कारवाई व्हावी याकरिता उके यांनी सुरुवातीला जेएमएफसी (प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी) न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. जेएमएफसी न्यायालयाने ७ सप्टेंबर २०१५ रोजी तो अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे उके यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन रिव्हिजन अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालयाने ३० मे २०१६ रोजी तो अर्ज मंजूर करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय अवैध ठरवून रद्द केला. तसेच, जेएमएफसी न्यायालयाला या प्रकरणावर नव्याने निर्णय देण्याचा आदेश दिला होता. परिणामी, फडणवीस यांनी उच्च न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करून सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने ३ मे २०१८ रोजी फडणवीस यांचा अर्ज मंजूर केला व सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून जेएमएफसी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. त्याविरुद्ध उके यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने १ आॅक्टोबर २०१९ रोजी ते अपील मंजूर करून उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला होता. त्यामुळे हे प्रकरण नव्याने कार्यवाहीसाठी जेएमएफसी न्यायालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, सीजेएम (मुख्य न्याय दंडाधिकारी) न्यायालयाने हे प्रकरण स्वत:कडे स्थानांतरित करून घेतले. सध्या हे प्रकरण सीजेएम न्यायालयात प्रलंबित आहे.सीजेएम न्यायालयात हजेरीपासून सूटसर्वोच्च न्यायालयाने स्वत:च्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास मंजुरी दिल्यामुळे सीजेएम न्यायालयाने स्वत:समक्ष प्रलंबित प्रकरणामध्ये फडणवीस यांना व्यक्तीश: हजर राहण्यापासून शुक्रवारपुरती सूट दिली व प्रकरणावर १० फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. तसेच, दरम्यानच्या वेळेत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर स्थगिती न दिल्यास फडणवीस यांनी पुढील तारखेला व्यक्तीश: हजर व्हावे, असे निर्देश दिले. उके यांनी फडणवीस यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सीजेएम न्यायालयाने तो अर्ज पुढील तारखेपर्यंत प्रलंबित ठेवला.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस