शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटींची कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 9:22 PM

शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ६८ हजार शेतकऱ्यांना ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ५८ हजार शेतकऱ्यांना ५९२ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री चंद्र्शेखर बावनकुळे यांनी दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे २९,१०५ शेतकऱ्यांना २१३.९१ कोटींची कर्जमाफी झाली असून, ग्रामीण बँकेमार्फत १२७७ शेतकऱ्यांच्या खात्यात ४.८४ कोटी रुपये जमा करण्यात आले. राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ३७,७७८ शेतकऱ्यांना २०५.८५ कोटींचे कर्ज माफ झाले आहे.नागपूर जिल्ह्यात एकूण ४९ हजार शेतकऱ्यांना ३५.६३ कोटी, प्रोत्साहनपर १३,५३७ शेतकºयांना ३० कोटी, ओटीएसअंतर्गत ५,२७२ शेतकऱ्यांना ५८ कोटी असे एकूण ४२४.६० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे.नागपूर जिल्हा खरीप पीक कर्ज वाटपांतर्गत डिसेंबरअखेरपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ३७०० लाख, राष्ट्रीयीकृत बँकेमार्फत ५४,२०३ लाख, ग्रामीण बँकेमार्फत १३२९ लाख, असे एकूण ५९२.३२ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयेजिल्ह्यातील संत्रा उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासोबतच संत्र्याच्या कलमा तयार करण्यासाठी संत्रा नर्सरी प्रशिक्षण आयोजित करावे, अशी सूचना सदस्यांनी केली असता, संत्रा नर्सरी प्रशिक्षणासाठी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तीर्थस्थळ विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता, पशुसंवर्धन, आरोग्य विभागाच्या विविध योजना, दुग्धविकास तसेच इतर योजनांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.दीक्षाभूमी विकासासाठी मंजूर १०० कोटी निधीपैकी ५० कोटी निधी ड्रॅगन पॅलेस, ताजबाग यासाठीचा विकास निधी वितरित करण्यात आला आहे.मुख्यमंत्री ग्रामीण रस्ते विकास योजनेंतर्गत ६००किलोमीटरचे रस्ते मंजूर झाले असून, या रस्त्यांच्या बांधकामालाही प्राधान्य द्यावे, अशी सूचना करण्यात आली. जिल्हा नियोजन मंडळातर्फे शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, चार स्मशानभूमीवर पर्यावरणपूरक शवदाहिनी बसविण्यात येत आहे यापैकी मोक्षधाम येथे २ कोटी ४० लक्ष रुपये खर्चास मान्यता देण्यात आली असून, ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येत असल्याचे यावेळी पालकमंत्र्यांनी सांगितले.दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्यजिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागातील कामांना प्राधान्य देण्यासाठी सोबत शैक्षणिक शुल्क माफ करणे तसेच पीक विमा योजनेचा लाभ देण्यासंदर्भातही यावेळी निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :guardian ministerपालक मंत्रीFarmerशेतकरी