शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रकृती चांगली वाटत नसल्याने गावाकडे निघालेल्या उत्तर प्रदेशातील एका तरुणावर काळाने मध्येच झडप घातली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : प्रकृती चांगली वाटत नसल्याने गावाकडे निघालेल्या उत्तर प्रदेशातील एका तरुणावर काळाने मध्येच झडप घातली. बसच्या प्रतपक्षेत असताना बसल्याबसल्याच त्याचा मृत्यू झाला. पत्रकार भवनाजवळ गुरुवारी सकाळी ही घटना घडली.

सोनू गंगाप्रसाद राजपूत (वय २६) असे मृताचे नाव आहे. तो रायबरेली (उत्तर प्रदेश) जिल्ह्यातील अंतरलहर (लालगंज) येथील रहिवासी होता. रोजगाराच्या शोधात गावातील काही तरुणांसोबत सोनू महाराष्ट्रात आला होता. लातूरला त्यांना काम मिळाले त्यामुळे सोनू तिकडे राहत होता. दोन दिवसांपासून सोनूला बरे वाटत नव्हते. त्यामुळे हरिशंकर निर्भयशंकर राजपूत (वय २०, रा. अंतरलहर) सोबत सोनू गावाकडे निघाला. हे दोघे खासगी बसने नागपुरात आले. टिळक पत्रकार भवनासमोर असलेल्या ट्रॅव्हल्सच्या ऑफिसजवळून त्यांना दुसरी बस पकडायची होती. त्यांचे तिकीट बुक होते. त्यामुळे सोनू आणि हरिशंकर भल्या सकाळी पत्रकार भवनाच्या वॉल कंपाऊंडलगत बसले. सकाळी ६ च्या सुमारास सोनू बसल्याबसल्याच कलंडला. तो निपचित पडल्याचे पाहून हरिशंकरने आरडाओरड केली. बाजूच्यांनी धंतोली पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनूचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर मृतदेह मेडिकलला हलविण्यात आला. हरिशंकर राजपूतच्या तक्रारीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

---