नागपुरात मेट्रोच्या कामावरील मजुराचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:58 IST2018-08-17T22:57:46+5:302018-08-17T22:58:53+5:30
मेट्रोच्या कामावर असलेल्या एका मजुराचा उंचावरून खाली पडून करुण अंत झाला. दीपक पंजाबराव गवई (वय ४६) असे मृताचे नाव आहे. ते नागलवाडी, वडधामना येथील रहिवासी होते.

नागपुरात मेट्रोच्या कामावरील मजुराचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रोच्या कामावर असलेल्या एका मजुराचा उंचावरून खाली पडून करुण अंत झाला. दीपक पंजाबराव गवई (वय ४६) असे मृताचे नाव आहे. ते नागलवाडी, वडधामना येथील रहिवासी होते.
वाडीतील मेट्रो रेल कार्टिंग यार्डमध्ये ते बांधकामस्थळी १४ फूट उंचावर चढून पाणी देत होते. गुरुवारी सकाळी ९.४० च्या सुमारास धोक्याच्या ठिकाणी काम करीत असताना सुरक्षेची कोणतीही साधनं त्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे संतुलन बिघडून ते उंचावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराकरिता लता मंगेशकर हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. उपचारादरम्यान दुपारी २.१० च्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नितीन भोजराज मेश्राम (वय २५, रा. वडधामना) यांनी दिलेल्या सूचनेवरून वाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. गवई यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांचा आधार गेला आहे. त्यांना मेट्रो प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे. पोलीस पुढील तपास सुरू आहे.