शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला फाशी की जन्मठेप?

By admin | Updated: April 13, 2016 03:21 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी चंद्रपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरविले.

हायकोर्टात आज निर्णय : चंद्रपुरातील तिहेरी हत्याकांडनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी चंद्रपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत दोषी ठरविले. शिक्षेवर बुधवारी निर्णय देण्यात येणार आहे. आरोपीची फाशीची शिक्षा कायम राहते की, जन्मठेपेत परिवर्तित होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इमदाद अली वाहेद अली (५५) असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी, मुलगी व सासूची चाकू भोसकून हत्या केली आहे. आरोपीच्या पत्नीचे नाव शमशाद अली (४०), मुलीचे नाव इसाना अली (१९) तर, सासूचे नाव हारुनिसा हबिब खान (६०) होते. याप्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी पूर्ण झाली. आरोपी पक्ष व सरकार पक्ष यांचे वकील बुधवारी शिक्षेवर युक्तिवाद करतील. यानंतर न्यायालय शिक्षा जाहीर करेल.ही घटना २ एप्रिल २०१४ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली होती. आरोपी मातानगर ता. तुमसर जि. भंडारा येथील मूळ रहिवासी आहे. तो पत्नी व मुलीसह सासरी चंद्रपूर येथे आला होता. घटनेच्या दिवशी आरोपीचे क्षुल्लक कारणावरुन पत्नी व सासूसोबत भांडण झाले. दरम्यान, त्याने रागाच्या भरात पत्नी, मुलगी व सासूवर चाकुने वार केले. पत्नी व मुलगी जागेवरच ठार झाली तर, सासूचा ५ एप्रिल २०१४ रोजी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आरोपीचा मुलगा आसिल इमदाद अली सय्यद यांनी रामनगर पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदविली होती.३ डिसेंबर २०१५ रोजी सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत फाशी तर, कलम २०१ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. यानंतर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३६६ अनुसार हे प्रकरण उच्च न्यायालयासमक्ष सादर केले. तसेच, आरोपीने अपील दाखल करून शिक्षेला आव्हान दिले. आरोपीतर्फे अ‍ॅड. एफ. एन. हैदरी तर, शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील विनोद ठाकरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)आदेशातील महत्त्वाचे मुद्देआरोपीविरुद्ध तिहेरी हत्येचा गुन्हा सिद्ध होण्यास प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व मयत हारुनिसा (आरोपीची सासू) हिचे शेजारी तवंगर खान यांचे बयान आणि त्यांच्या बयानाशी साम्यता दर्शविणारे परिस्थितीजन्य पुरावे महत्त्वपूर्ण ठरले. तवंगर खान यांचे घर हारुनिसाच्या घरापुढे आहे. घटनेच्या दिवशी ते घरीच होते. आरोपीला मयतांवर हल्ला करताना त्यांनी पाहिले होते. तवंगर खान यांचे बयान न्यायालयाने विश्वासार्ह ठरविले. तसेच, एफआयआर, चाकूची जप्ती, आरोपीने घटनास्थळ दाखविणे, वैद्यकीय अहवाल इत्यादी परिस्थितीजन्य पुरावे त्यांच्या बयानाशी साम्यता दर्शविणारे असल्याचे स्पष्ट केले.सरकारी पक्षाने हारुनिसाची दोन मृत्यूपूर्व बयाने न्यायालयात सादर केली होती. ही दोन्ही बयाने उच्च न्यायालयाने संशयास्पद ठरविली. तपास अधिकाऱ्याने नोंदविलेल्या बयानाच्या सुरुवातीला व शेवटी हारुनिसा ही बयान देण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम होती असा डॉक्टरचा शेरा लिहिण्यात आला नाही. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेल्या दुसऱ्या बयानात वेळ नमूद करण्यात आली नाही. यासह विविध बाबी लक्षात घेता दोन्ही बयान विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाने सांगितले. रुग्णालयात भरती केले तेव्हा हारुनिसाची अवस्था चांगली नव्हती असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.