शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

नागपुरात ट्रकच्या धडकेत युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:50 AM

भरधाव ट्रकने धडक मारल्यामुळे दुचाकीवरील एका युवतीचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भंडारा मार्गावर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.

ठळक मुद्देभंडारा मार्गावर तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भरधाव ट्रकने धडक मारल्यामुळे दुचाकीवरील एका युवतीचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी ४.३० च्या सुमारास भंडारा मार्गावर कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला.रश्मी श्यामसुंदर खन्ना (वय २७) असे मृत युवतीचे नाव आहे. ती म्हाडा कॉलनी हिंगणघाट येथील रहिवासी होती. रश्मी तिच्या दुचाकीने दुपारी ४.३० च्या सुमारास भंडारा मार्गाने जात असताना वेगात आलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३१/ सीबी ०८१३ च्या चालकाने तिला जोरदार धडक मारली. त्यामुळे रश्मीचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कळमना पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी जमवाला शांत केले. त्यानंतर आरोपी ट्रकचालकाविरुद्ध कळमना पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. त्याची चौकशी केली जात आहे.विषारी वायुने गुदमरल्याने एकाचा करुण अंतगटरची सफाई करताना विषारी वायुने गुदमरल्याने प्रकृती ढासळून एका व्यक्तीचा करुण अंत झाला. हरिदास भजन देशभ्रतार (वय ५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते शांतिनगरातील मुदलियार चौकाजवळ राहत होते. शुक्रवारी दुपारी १.४५ वाजता ते प्रजापतीनगर, नंदनवनमधील एका गटाराची सफाई करत असताना त्यांना गुदमरल्यासारखे झाले. ते बेशुद्ध पडले त्यामुळे सहकाऱ्यांनी देशभ्रतार यांना लगेच मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी देशभ्रतार यांना मृत घोषित केले. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.गळफास लावून आत्महत्यासीताबर्डीच्या कोष्टीपुरा रेणुकामाता सोसायटीत राहणारे विनोद नत्थूजी गोंडाणे (वय ३५) यांनी शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. उषाराम नत्थुजी गोंडाणे (वय ७०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.विहिरीत मृतदेह आढळलारमेश बघूजी चांदेकर (वय ४२, रा. अंबर कॉलनी साईनगर दाभा) यांचा मृतदेह गिट्ठीखदानमधील अंतरभारती आश्रमच्या परिसरातील विहिरीत आढळला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर चर्चेला उधाण आले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू