शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

नागपुरात वीज कर्मचा-याचा करंटमुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:39 AM

वीज दुरुस्तीचे काम करीत असताना खांबावर जिवंत विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका वीज कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला.

ठळक मुद्देविविध घटनांमध्ये चौघांचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज दुरुस्तीचे काम करीत असताना खांबावर जिवंत विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने एका वीज कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला. विनोद वासुदेवराव टेंभेकर (वय ३०) असे मृताचे नाव आहे. टेंभेकर मानकापूरच्या डोळे ले-आऊटमध्ये राहत होते. ३ जूनच्या पहाटे जरीपटक्यातील मयूरनगरात वीज पुरवठा खंडित झाल्याने ते वीज मंडळातील आपल्या सहकाऱ्यांसह पहाटे ५ वाजता मयूरनगरात गेले. खांबावर चढून दुरुस्तीचे काम करीत असताना अचानक त्यांना विजेचा करंट लागला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी ५.४५ वाजता डॉक्टरांनी टेंभेकर यांना मृत घोषित केले. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यांच्या मृत्यूमुळे टेंभेकर परिवाराने कर्ता पुरुष गमावला आहे.चौथ्या माळ्यावरून खाली पडून मजुराचा करुण अंतभंडारा मार्गावरील सुभाषनगरात राहणारे दीपक शंकरराव कांबळे (वय ३८) यांचा चौथ्या माळ्यावरून खाली पडून करुण अंत झाला. कळमन्यातील महालगाव कापसीच्या उमिया मार्केटमध्ये दीपक कांबळे चौथ्या माळळ्यावर सेंट्रींगचे काम करीत होते. शुक्रवारी सायंकाळी ५.१५ वाजता ते तोल गेल्याने तिसºया माळ्यावर पडले. त्यांना गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी त्यांना मेडिकलमध्ये नेण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. गरीब कुटुंबातील दीपक कांबळे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. पोलीस अशा प्रकरणात गरीब ठेकेदाराला आरोपी बनवून इमारत निर्माण करणाºया तसेच ज्यांची प्रत्यक्ष सुरक्षेची जबाबदारी आहे, अशांना कारवाईपासून दूर ठेवतात. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गळफास लावून आत्महत्यागंगाबाई घाट, स्वीपर कॉलनीत राहणारे रोशन संगीत सातपुते (वय ४५) यांनी शुक्रवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.तरुणाने जाळून घेतलेअजनीतील बजरंगनगरात राहणारे प्रवीण संजय चव्हाण (वय २९) यांनी १ जूनला दुपारी स्वत:ला पेटवून घेतले. गंभीर अवस्थेत मेडिकलमध्ये उपचार घेत असताना त्यांना शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अजनी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

चालू कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले 

चालू कुलरमध्ये पाणी भरणे एका तरुणीच्या जीवावर बेतले. पठाण ले आऊट, त्रिमुर्ती नगरात राहणाऱ्या नेहा कासीम पठाण (वय २२) या शनिवारी सकाळी चालू असलेल्या कुलरमध्ये पाणी भरत होत्या. नेहा यांना कुलरचा करंट लागला. त्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. त्यांना मेयोत नेले असता डॉक्टरांनी सकाळी ८.१० वाजताच्या सुमारास मृत घोषित केले.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज