शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

विदर्भात दोन महिन्यानंतर मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 9:10 PM

Death by Corona Virus decline, Vidarbha News विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे.

ठळक मुद्दे३१ मृत्यू व १२५२ रुग्णांची नोंद : रुग्णसंख्या १,६६,४७४ तर मृतांची संख्या ४,४७८

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातही आता कोरोनाचा जोर कमी होऊ लागला आहे. बाधितांसोबतच मृतांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे. विशेष म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी ३१ मृत्यूची नोंद होती. त्यानंतर दोन महिन्यानंतर मृतांची संख्या ३१ वर आली आहे. आज १,२५२ रुग्णांची भर पडली. बाधितांची एकूण संख्या १,६६,४७४ झाली असून मृतांची संख्या ४,४७८ पोहचली आहे.नागपूर जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. शिवाय मृतांचे आकडेही कमी होऊ लागले आहेत. शनिवारी ६२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून १७ रुग्णांचे मृत्यू झाले. रुग्णांची एकूण संख्या ८६,०९० झाली तर मृतांची संख्या २,७६७ वर पोहचली. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र रुग्णसंख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. आज १२६ रुग्णांची भर पडली तर एका रुग्णाचा बळी गेला. रुग्णसंख्या ११,८९० तर मृतांची संख्या १८१ झाली आहे. अमरावती जिल्ह्यात ११३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या १४,८२५ झाली. एका रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या ३२७ वर गेली. भंडारा जिल्ह्यात ९५ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ६,६८५ तर मृतांची संख्या १५९ झाली. गोंदिया जिल्ह्यात ६३ रुग्णांची नोंद व एका रुग्णाचा मृत्यू झाला. बुलडााणा जिल्ह्यात ५६ रुग्ण व एकाचा बळी गेला. वाशिम जिल्ह्यात ३१ रुग्णांची भर पडली. वर्धा जिल्ह्यात ७४ रुग्ण पाच रुग्णांचे बळी गेले. अकोला जिल्ह्यात २० रुग्ण पॉझिटिव्ह आले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात ३७ रुग्णांची नोंद झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूVidarbhaविदर्भ