आणखी एका वृद्धेचा मृत्यू
By Admin | Updated: March 15, 2015 02:15 IST2015-03-15T02:15:55+5:302015-03-15T02:15:55+5:30
स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. शनिवारी आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

आणखी एका वृद्धेचा मृत्यू
नागपूर : स्वाईन फ्लू बळीची संख्या वाढतच आहे. शनिवारी आणखी एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत नागपूर विभागात स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचे बळी घेतले आहेत. शनिवारी संशयित स्वाईन फ्लूचे २६ नमुने तपासण्यात आले यातील १० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. ललिता डोंगरे (६०) रा. वाठोडा असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ललिता डोंगरे यांना ९ मार्च रोजी मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात भरती करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या दोन दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मेडिकलचे शनिवारी संशयित स्वाईन फ्लूचे १० नमुने तपासण्यात आले. यातील तीन रुग्णांना या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यात ३६ आणि ४० वर्षे वयोगटातील दोन पुरुष तर ६० वर्षाची एक महिला आहे. वॉर्ड २५ मध्ये सात संशयित तर पाच पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तब्बल दोन महिन्यानंतर लहान मुलांचा वॉर्ड रिकामा झाला आहे. नागपूर विभागात १६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
यात पहिल्यांदाच एक छत्तीसगड येथील रुग्ण आढळून आला आहे. विभागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५८ झाली आहे. (प्रतिनिधी)