नागपुरात प्रॉपर्टी डीलरकडे धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 23:53 IST2021-01-05T23:52:06+5:302021-01-05T23:53:11+5:30
Daring theft, crime news घरमालकाचा हलगर्जीपणा चोरट्यांना झटक्यात लखपती करणारा ठरला. घराचे दार उघडे असल्याची संधी साधून मनीषनगरातील एका प्रॉपर्टी डीलरच्या घरातून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड व माैल्यवान चिजवस्तूंसह पाच लाखांचा ऐवज लंपास केला.

नागपुरात प्रॉपर्टी डीलरकडे धाडसी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : घरमालकाचा हलगर्जीपणा चोरट्यांना झटक्यात लखपती करणारा ठरला. घराचे दार उघडे असल्याची संधी साधून मनीषनगरातील एका प्रॉपर्टी डीलरच्या घरातून चोरट्यांनी दोन लाखांची रोकड व माैल्यवान चिजवस्तूंसह पाच लाखांचा ऐवज लंपास केला.
मनीषनगरातील मिलिंद सोसायटीत राहणारे फुरकान सिद्दिकी प्रापर्टी डीलर आहेत. त्यांचे अमरावती मार्गावर फार्महाऊसही आहे. २१ ते २२ डिसेंबरच्या दरम्यान ते चेन्नईला गेले होते. घराबाहेर जाताना त्यांना दाराला कुलूप लावण्याची आठवण राहिली नाही. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेतला. उघड्या दारातून घरात शिरून चोरट्यांनी शयनकक्षातील कपाटात असलेले रोख २ लाख रुपये, सोन्याचे दागिने आणि १७ हातघड्याळ तसेच प्लॉटची कागदपत्रे लांबविली. फुरकानने सोमवारी या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरट्याचा माग काढण्याचे प्रयत्न केले. सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्या आधारे पोलीस चोरट्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
---
ओळखीच्यांनीच साधला डाव
या चोरीच्या अनुषंगाने परिसरात उलटसुलट चर्चा आहे. फुरकानकडे नेहमी येणाऱ्यांपैकीच कुणीतरी ही चोरी केल्याची चर्चा आहे. पोलीस या संबंधाने चाैकशी करीत आहेत.