शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दमानियांना लागला दम !

By admin | Updated: May 17, 2014 02:01 IST

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील लाटेवर स्वार होऊन नागपूरच्या रिंगणात उतरलेल्या अंजली दमानिया यांचा झाडू पाहिजे तसा चालला नाही. राज्य पातळीवरील नेत्या, बड्या राजकीय नेत्यांवर

लाखाचा पल्लाही गाठला नाही : चौथ्या क्रमाकांवर समाधान

चंद्रशेखर बोबडे - नागपूर

आम आदमी पार्टीच्या दिल्लीतील लाटेवर स्वार होऊन नागपूरच्या रिंगणात उतरलेल्या अंजली दमानिया यांचा झाडू पाहिजे तसा चालला नाही. राज्य पातळीवरील नेत्या, बड्या राजकीय नेत्यांवर केलेल्या आरोपांमुळे निर्माण झालेली लढाऊ प्रतिमा, केजरीलांच्या सभेला नागपुरात मिळालेला प्रतिसाद पाहता त्या लाखाचा पल्ला गाठतील, अशी अपेक्षा होती. या अपेक्षाला मात्र, त्यांनी घेतलेल्या कमी मतांमुळे तडा गेला. दमानिया या स्वत:चे डेपॉझिटही वाचविण्यातही अपयशी ठरल्या.

प्रतिस्पर्धी राजकीय पक्षावर आरोप आणि केजरीवाल यांचा करिश्मा या दोनच मुद्यांचा आधार घेऊन रिंगणात उतरलेल्या आम आदमी पार्टीच्या अंजली दमानिया यांनी प्रतिकूल परिस्थितीत पहिल्याच निवडणुकीत घेतलेली ६९0८९ मते राजकीय निरीक्षकांची लक्ष वेधणारी ठरली आहे. इतर अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत रामटेकमध्ये ‘आप’चे प्रताप गोस्वामी यांनीही बरी मते घेतली. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो व त्याला छेद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मजबूत मोर्चेबांधणी केली होती. या दोन सर्वच बाबींने मजबूत असणार्‍या पक्षांच्या लढतीत आम आदमी पार्टीने उडी घेतली तेंव्हा या पक्षाचा विशेष परिणाम निवडणुकीत दिसून येणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. विशिष्ट लोकांपर्यंंतच र्मयादित असलेला पक्ष, मोजकेच कार्यकर्ते आणि जातीय समीकरणे याचा विचार केला तर आम आदमी पार्टीला अनेक र्मयादा होत्या. विशेष म्हणजे या पक्षाच्या उमेदवार बाहेरच्या होत्या पक्षाला संघटनात्मक पाठबळही नव्हते. केवळ केजरीवाल यांचा करिश्मा आणि भ्रष्टाचाराला विरोध हाच एकमेव आधार या पक्षाचा होता. पक्षाला नाव ‘आम’ असले तरी तो कधीही ‘आम आदमी’चा वाटत नव्हता. मात्र ‘आप स्टाईल’ प्रचाराने दमानिया यांनी शहर ढवळून काढले. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात दमानिया यांनी झोपडपट्टी व मुस्लिम वस्त्यांमध्ये मुसंडी मारली होती. पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ‘आप’चे वादळ शमलेले दिसले. त्यामुळे चौरंगी लढतीत दमानिया फक्त ३0 ते ४0 हजार मते घेतील, असे अंदाज बांधले जात होते. पण दमानिया यांना ६९0८१ मते मिळाली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी मारलेली मजल ही लक्षवेधी तर आहेच शिवाय ‘आप’च्या कार्यकर्त्यांंचा उत्साहही वाढविणारी आहे.‘आप’ला कमजोर समजणार्‍यांनाही ती एक प्रकारची चपराकच आहे, अशी प्रतिक्रया व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासूनच त्यांना मिळणार्‍या मतांमध्ये सातत्य आढळून आले. पहिल्या फेरीत ५८९0, दुसर्‍या फेरीत ४७५६ मते त्यांनी घेतली. त्यानंतरच्या फेरीत त्यांना पडलेली मते ही तीन ते पाच हजार या दरम्यान होती. शहराच्या प्रत्येक भागात ‘आप’ने त्यांचे अस्तित्व अधोरेखित केल्याचेच यावरून दिसून येते. नागपूरकर जनतेने दिलेला कौल मान्य करीत यापुढेही जनतेच्या कामासाठी सातत्याने झटत राहू, असे आश्‍वासन दमानिया यांनी दिले आहे.

रामटेकच्या रिंगणात उतरलेले प्रताप गोस्वामी यांचा राजकीय पिंड नव्हता. आरटीआय कार्यकर्ते, अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे दमानियांसारखे कुठलेही वलय नव्हते. कार्यकर्त्यांंची फौज नव्हती. तरिही इतर अपक्ष उमेदवारांच्या तुलनेत त्यांनी २५ हजार ८९९ मते घेतली.