शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

विभागातील धरणे कोरडीच : केवळ ३४.२५ टक्के साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:33 IST

आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउन्हाळ्यात पाणी टंचाईची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आॅगस्ट महिना सुरू होऊन आठवडा होत आहे. परंतु विभागातील धरणे मात्र अजूनही कोरडीच आहेत. मोठ्या प्रकल्पांचा विचार केल्यास विभागातील १८ मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. येत्या दीड महिन्यात चांगला पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.पावसाळ्याचे दिवस आहे, परंतु काही अपवाद वगळ्यास अजूनही पाऊस पुरेसा झालेला नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात जुलै ६ तारखेला आलेला मुसळधार पाऊस सोडला तर धरणाना अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार नागपूर विभागातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ४ आॅगस्ट रोजी केवळ ३४.२५ टक्के इतकाच जलसाठा आहे. नागपूर विभागात एकूण १८ मोठे प्रकल्प आहेत. त्यांची एकूण क्षमता ३५५३.७७ दलघमी इतकी असून यात १२१७.२७ दलघमी (३४.२५ टक्के) इतकाच जलसाठा आहे. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह धरणाची क्षमता १०१६.८८ इतकी आहे. यात २१९.९० दलघमी म्हणजे २१.६२ टक्के इतका जलसाठा आहे. यासोबतच कामठी खैरीमध्ये ६३.५८ टक्के, रामटेकमध्ये ३४.३९ टक्के, लोवर नांद वणा ५३.७४ टक्के, वडगाव ५६.९६ टक्के, गोंदिया जिल्ह्यातील इटियाडोह ४७.८ टक्के, सिरपूर २६.९७ टक्के, पुजारी टोला ७५.७६ टक्के, कालीसरार ७०.६९ टक्के, धापेवाडा बॅरेज टप्पा २- ९.९४ टक्के, चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा ९३.४६ टक्के, गडचिरोली जिल्ह्या दिना ६४.५२ टक्के, वर्धा जिल्ह्यातील बोर २९.७२ टक्के, धाम ३२.७५ टक्के, पोथरा १०० टक्के, लोअर वर्धा टप्पा १- २८.८० टक्के, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द टप्पा १ - २८.४ आणि बावनथडी २९.१३ टक्के इतका पाणीसाठा आहे.पोथरा हाऊसफुल्ल, असोलामेंढा ९३ टक्के भरलाविभागातील मोठ्या प्रकल्पांपैकी केवळ वर्धा जिल्ह्यातील पोथरा प्रकल्प १०० टक्के भरला. तर चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा प्रकल्प ९३.४६ टक्के इतक ा भरला आहे. परंतु या दोन्ही प्रकल्पांचा एकूण साठा कमी आहे. पोथराची क्षमता ३५ दलघमी तर असोलामेंढाचा ५२.३३ दलघमी इतका साठा आहे.येत्या दिवसात धरण भरण्याची शक्यताजलसंपदा विभागाने जारी केलेल्या एकूण पाणीसाठ्याच्या माहितीनुसार गेल्या वर्षी आजच्याच तारखेचा एकूण पाणीसाठा पाहिला तर तो केवळ २१.७९ टक्के इतकाच होता. तेव्हा आॅगस्ट आणि सप्टेंबर महिना शिल्लक असल्याने येत्या दिवसात धरणे भरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसे झाले नाही तर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

 

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई