नागपूरमध्ये ११ ठिकाणी संचारबंदी, ५० हून अधिक समाजकंटक ताब्यात; असं झालंय नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:15 IST2025-03-19T07:14:20+5:302025-03-19T07:15:34+5:30
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांतता कायम राहण्यावर सर्व समाजाने भर द्यावा, असे आवाहन केले.

नागपूरमध्ये ११ ठिकाणी संचारबंदी, ५० हून अधिक समाजकंटक ताब्यात; असं झालंय नुकसान
नागपूर : सोमवारी सायंकाळी तरुणांच्या दोन गटांत झालेल्या भीषण राड्यात काही असामाजिक तत्त्वांनी जाळपोळ केली. पोलिसांच्या दिशेने दगडफेक करीत धक्काबुक्की केल्याने ५५ जण जखमी झाले. यातील ३ मेयोमध्ये, तर १२ रुग्ण मेडिकलमध्ये भरती आहेत. जखमींमध्ये २४ पोलिसांचा समावेश आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शांतता कायम राहण्यावर सर्व समाजाने भर द्यावा, असे आवाहन केले.
कुठे लावला कर्फ्यू
कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर व कपिलनगर.
असे झाले नुकसान
२० हून अधिक वाहनांची जाळपोळ
७५ हून अधिक वाहनांची तोडफोड
३५ हून अधिक पोलिस जखमी
५० हून अधिक समाजकंटक ताब्यात