बापाची क्रूरता... पोटच्या गोळ्यांना विष देत केली आत्महत्या; सात वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

By योगेश पांडे | Updated: January 16, 2023 14:17 IST2023-01-16T14:13:43+5:302023-01-16T14:17:54+5:30

वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली

cruel father commits suicide after giving poison to children in nagpur; daughter died, son critical | बापाची क्रूरता... पोटच्या गोळ्यांना विष देत केली आत्महत्या; सात वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

बापाची क्रूरता... पोटच्या गोळ्यांना विष देत केली आत्महत्या; सात वर्षीय मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

नागपूर : मकरसंक्रांतीच्या दिवशीच नागपुरात एका सैतान बापाने पत्नीच्या वादाचा बदला घेण्यासाठी चक्क स्वत:च्याच मुलामुलीला विष दिले. यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. तर दुसरीकडे बापानेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत ही हृदयद्रावक घटना घडली.

मनोज अशोक बेले (४५) असे सैतानी बापाचे नाव आहे. त्याचे पत्नी प्रियासोबत सातत्याने वाद व्हायचे व त्यामुळे दोघेही वेगवेगळे रहायचे. सात वर्षीय तनिष्का व १२ वर्षीय प्रिन्स हे आईसोबत रहायचे. तर मनोज हा वाठोड्यातील नागोबा गल्ली येथे रहायचा. पती-पत्नीने आपापसात केलेल्या समझोत्यानुसार तनिष्का व प्रिन्स हे दर रविवारी वडिलांकडे जायचे.

रविवारी सकाळी आजोबांनी दोघांना मनोजच्या घरी सोडले. मनोजने मुलांना खाऊपिऊ घातले व जेवणात विष टाकले. शिवाय त्यांचा गळा आ‌वळण्याचादेखील प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती खराब झाल्याने त्यांना उपचारासाठी भरती करण्यात आले. त्यात तनिष्काचा मृत्यू झाला, तर प्रिन्सवर मेडिकल इस्पितळात उपचार सुरू आहेत. यानंतर मनोजने स्वत:च्याच घरी लाकडी बल्लीला गळफास घेऊन आत्महत्या केली. वाठोडा पोलिसांनी मृतक मनोजविरोधात गुन्हा नोंदविला असून तपास सुरू आहे.

Web Title: cruel father commits suicide after giving poison to children in nagpur; daughter died, son critical