रेल्वेच्या धडकेमुळे सीआरपीएफ महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 00:27 IST2019-03-12T00:26:29+5:302019-03-12T00:27:23+5:30
रेल्वे इंजिनाची धडक लागल्यामुळे ‘सीआरपीएफ’च्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री कळमना येथील राजीव गांधीनगर येथे झाला.

रेल्वेच्या धडकेमुळे सीआरपीएफ महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे इंजिनाची धडक लागल्यामुळे ‘सीआरपीएफ’च्या महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री कळमना येथील राजीव गांधीनगर येथे झाला. मृत माया लेखराम धीमान (५०) या ‘सीआरपीएफ’मध्ये कार्यरत होत्या. त्यांचे पतीदेखील ‘सीआरपीएफ’चे निवृत्त कर्मचारी आहेत. दोघेही दुचाकीने कामठीला गेले होते. तेथून रात्री ९.४५ वाजता परत येथ असताना राजीव गांधीनगर येथील मानवरहित रेल्वे क्रॉसिंग पार करताना रेल्वेच्या इंजिनाची अॅक्टिव्हाला धडक बसली. ही धडक गाडीच्या मागील भागाला बसली. यामुळे धीमान दाम्पत्य खाली पडले. माया या इंजिनकडे तर लेखराम दुसऱ्या बाजूला पडले. इंजिनची धडक बसल्याने माया गंभीर जखमी झाल्या. इस्पितळात पोहोचल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. रेल्वे क्रॉसिंगजवळ अंधार होता. रुळ ओलांडत असताना त्यांना रेल्वेगाडी दिसली नाही. अर्धे रुळ पार केल्यानंतर अचानक इंजिनने दुचाकीला धडक मारली, असे लेखराम यांनी सांगितले आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूचे प्रकरण नोंदवून चौकशीला सुरुवात केली आहे.