शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

दुबार पेरणीचे संकट, बियाणांचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

भिवापूर : समाधानकारक पावसाच्या आगमनाने खरीपाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली. सुरुवातीच्या काळात पेरण्या साधल्यात. मात्र त्यानंतर ...

भिवापूर : समाधानकारक पावसाच्या आगमनाने खरीपाची सुरुवात झाली. शेतकऱ्यांनी पेरणीही सुरु केली. सुरुवातीच्या काळात पेरण्या साधल्यात. मात्र त्यानंतर पेरलेले बियाणे गत गुरुवारच्या पावसात जमिनीत गडप झाले. प्रत्येक गावात दोन चार शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच दुसरीकडे तालुक्यात बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

तालुक्यात ९ ते १० जूनपासून अनेकांनी पेरणीला सुरुवात केली. समाधानकारक पाऊस असल्यामुळे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे बियाणे शेतात अंकुरले आहे. मात्र त्यानंतर १७ जून रोजी तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे १५ व १६ जून रोजी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणे जमिनीत खोलवर गडप झाले. जास्त पावसामुळे पेरलेल्या बियाणांवर शेतातील मातीचा थर बसला. त्यानंतर पाहीजे तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. तालुक्यातील जवळी, मालेवाडा, उखळी, चिचाळा, पाहमी, बोटेझरी, मांडवा, वासी, सोमनाळा, वाकेश्वर, भगवानपूर, सायगाव, सालेभट्टी, चारगाव, कवडसी (बरड) पांजरेपार, रोहना, चिखली आदी गावात काही शेतकऱ्यांच्या पेरण्या फसल्या आहेत. आलेल्या नैसर्गिक संकटांशी सामना करण्यासाठी स्वत:ला धीर देत नुकसानग्रसस्त शेतकऱ्यांनी दुबार पेरणीची तयारी चालविली आहे. अशात तालुक्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. कृषी सेवा केंद्राकडे सुध्दा आता बियाणे उपलब्ध नाही. त्यामुळे दुबार पेरणी करायची तरी कशी,असा प्रश्न विचारला जात आहे.

पावसाचे आगमन, शेतकऱ्यांना दिलासा

१७ जून रोजी तालुक्यात सर्वत्र पाऊस झाला. जवळी, मालेवाडा, चिचाळा या पट्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला. यात जमिनीत गडप झालेल्या बियाणांना मोकळा श्वास घेण्यासाठी त्यानंतर हलका पाऊस महत्वाचा होता. मात्र तब्बल पाच दिवस पावसाने उसंत घेतली आणि दुबार पेरणीची संकट ओढवले. अशातच मंगळवारी राञभर चांगला पाऊस झाल्याने ऑक्सिजनवरील कोवळ्या अंकुरलेल्या बियाणांना जीवनदान मिळाले आहे. शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

===Photopath===

230621\img-20210621-wa0085.jpg

===Caption===

१७ जूनच्या पावसामुळे जवळी येथील ह्या शेतात पेरलेले बियाणे जमिणीत गडप झाले आणि दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.