गुन्हेगाराचा शेजारच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 09:29 IST2021-03-26T09:29:37+5:302021-03-26T09:29:58+5:30

Nagpur news शेजारी राहणाऱ्या एका गुन्हेगाराने १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. राजदेव टेंगर शाहू (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Criminal atrocities on neighboring Chimukli; Accused Gajaad | गुन्हेगाराचा शेजारच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी गजाआड

गुन्हेगाराचा शेजारच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी गजाआड

ठळक मुद्देएमआयडीसीत संताप

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शेजारी राहणाऱ्या एका गुन्हेगाराने १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. राजदेव टेंगर शाहू (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपी शाहू एमआयडीसीत राहतो. त्याच्या शेजारी एक गरीब कुटुंब राहते. त्या कुटुंबातील पती-पत्नी नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी कामावर गेले. मोठी मुलगी दुपारी शिवणकामच्या वर्गाला गेली; तर १० वर्षांची मुलगी आणि छोटा मुलगा घरी होते. दुपारी २.३० च्या सुमारास आरोपी शाहू घरी आला. त्याने छोट्या मुलाला पैसे देऊन चिप्स आणण्यासाठी पाठवले आणि १० वर्षांच्या मुलीवर पाशवी अत्याचार केला. पीडित मुलीची मोठी बहीण शिवणक्लास आटोपून घरी आली तेव्हा हा नराधम नको ते कृत्य करताना दिसला. ती त्याच्यावर धावून गेली तेव्हा आरोपी पळून गेला. सायंकाळी मुलीचे आई-वडील घरी परतले तेव्हा मुलगी वेदनेने ओरडत होती. मोठ्या मुलीने आईला घडलेली घटना सांगितली. मुलीच्या आईने शेजाऱ्यांना ही माहिती दिल्यानंतर परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. जमावाने आरोपीच्या घरावर धाव घेतल्याने नराधम शाहू तेथून पळून गेला. पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. एपीआय मुसळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुरुवारी त्याला पोलीस कोठडीसाठी न्यायालयात नेण्यात आले.

यापूर्वीही केला गुन्हा

नराधम शाहू हा गुन्हेगारी वृत्तीचा आहे. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. तो दिवसभर परिसरात टवाळक्या करीत महिला, मुलींची छेड काढतो. त्याच्याबद्दल या भागात तीव्र संतापाचे वातावरण आहे.

---

Web Title: Criminal atrocities on neighboring Chimukli; Accused Gajaad