शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

हिंगण्यातील डान्स बारवर छापा...गझलच्या नावाखाली ठुमके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 10:34 IST

शहरापासून दूर एकांतस्थळी आरोपी नीलेश संतोषकुमार सिंग अनेक वर्षांपासून हा बार चालवितो. तेथे नेहमी गुन्हेगारांची वर्दळ असते.

ठळक मुद्देकुख्यात गुन्हेगारांसह सात जणांवर गुन्हे दाखलबार मालकाला अटक

नागपूर : गुन्हे शाखेच्या पथकाने हिंगणाजवळच्या मोंढा येथील आदित्य बार ॲन्ड रेस्टॉरंटमध्ये चालणाऱ्या डान्स बारवर छापा घातला. बार मालकाने त्यावेळी पोलिसांपासून सर्व झाकझूक केली. मात्र, सीसीटीव्हीच्या फुटेजवरून डान्स बारचे बिंग फुटले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी रविवारी सात जणांवर गुन्हा दाखल केला.

शहरापासून दूर एकांतस्थळी आरोपी नीलेश संतोषकुमार सिंग अनेक वर्षांपासून हा बार चालवितो. तेथे नेहमी गुन्हेगारांची वर्दळ असते. बारमध्ये गीत-गझलचा परवाना आहे. मात्र, त्या नावाखाली तेथे डान्स बार चालविला जातो, अशीही माहिती पोलिसांना मिळाली होती. ५ फेब्रुवारीच्या रात्री तेथे अशीच गुंडांची पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी रात्री तेथे छापा घातला.

पोलीस आल्याचे कळताच बार मालकाने आतमध्ये सर्व सामसूम केले. पोलिसांना तेथे कुख्यात गुंड नव्वा ऊर्फ मारोती वलके, राजेश पांडे, गिरीश कनोजिया आणि प्रदीप उके आढळले. त्यावरून पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता उपरोक्त आरोपी बारमधील गायक महिलांवर नोटा उधळत असल्याचे आणि त्या ठुमके लावत असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी रविवारी या प्रकरणात हिंगणा ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. बारचा परवाना सरलादेवी संतोषकुमार सिंग यांच्या नावावर आहे. आरोपी नीलेश संतोषकुमार सिंग हा तो बार चालवतो. तर तेथे सीमा विक्रम चाैधरी ही तरुणी व्यवस्थापक आहे. त्यांनाही या प्रकरणात पोलिसांनी आरोपी बनविले.

नीलेशला अटक, एक दिवसाचा पीसीआर

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संचालक नीलेशला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा एक दिवसाचा पीसीआर मिळवला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे तसेच सहायक आयुक्त रोषन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक सुनील चव्हाण, सहायक निरीक्षक समाधान बजबळकर, फाैजदार मोहन शाहू, वसंता चाैरे, हवलदार महेश फुलसुंगे, विनोद देशमुख, हेमंत लोणारे, सुनील नंदेश्वर यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीraidधाडArrestअटकPoliceपोलिसnagpurनागपूर