सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडवा; नितीन गडकरी यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 12:22 PM2022-11-29T12:22:04+5:302022-11-29T12:24:58+5:30

ॲग्रोव्हिजनचा समारोपीय कार्यक्रम; हंसराज अहीर, चंद्रशेखर बावनकुळे, अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी यांची उपस्थिती

Create happy, suicide-free and debt-free farmers says Nitin Gadkari | सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडवा; नितीन गडकरी यांचे आवाहन

सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडवा; नितीन गडकरी यांचे आवाहन

googlenewsNext

नागपूर : कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी पुढाकार घेऊन काम करा व त्यातून सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडविण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

राष्ट्रीय कृषी प्रदर्शन ॲग्रो व्हिजनच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी, माजी खा.शिशुपाल पटले, माजी खा.डॉ. विकास महात्मे, मापसूचे कुलगुरू डॉ.आशिष पातुरकर, आयोजन सचिव रवींद्र बोरटकर, गिरीश गांधी, रमेश मानकर उपस्थित होते.

नितीन गडकरी म्हणाले, ॲग्रोव्हिजन १३ वर्षांपासून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. या वर्षी जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. ३५ कार्यशाळांमधून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. येत्या काळात केवळ प्रदर्शन नव्हे, तर वर्षभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ॲग्रोव्हिजनचे कार्यालय, तसेच सेंद्रीय बाजाराची स्थापना करण्यात येत आहे. या सोयींमुळे सातत्य कायम राहील आणि वर्षभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत राहील.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदर्भाच्या कृषी प्रगतीत ॲग्रोव्हिजनचा मोठा वाटा आणि सहभाग असल्याचे सांगितले. अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी म्हणाले, ईशान्य भारतातील राज्यांना कृषिविषयक मार्गदर्शन करण्याचे काम नितीन गडकरी सातत्याने करतात. हंसराज अहीर म्हणाले, ॲग्रोव्हिजनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती आली आहे. शेतकरी जागृत आणि अभ्यासू होत आहे. प्रारंभी रवींद्र बोरटकर यांनी प्रदर्शनातील घडामोडींचा आढावा घेतला. संचालन रेणुका देशकर यांनी, तर रमेश मानकर यांनी आभार मानले.

स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार

निबंध स्पर्धेतील विजेते सायली देशमुख, वृषभ शेंडे, श्वेता डोंगलीकर, शेतकरी पुरस्कार गटात शुभम इमले, प्रियांका मेंढे व रेखा पांडव यांना प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबत प्रायोजकांचा सत्कारही करण्यात आला.

Web Title: Create happy, suicide-free and debt-free farmers says Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.