शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
3
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
5
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
6
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
7
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
8
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
9
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
10
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
11
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
12
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
13
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
14
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
15
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
16
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
17
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
18
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
19
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
20
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे

पर्यावरणाच्या आस्थेमुळे फटाक्यांची क्रेझ घटतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 11:26 AM

पर्यावरणाविषयीची आस्था वाढल्याने मागील काही वर्षात फटाके विक्रीसाठी परवानगी घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

ठळक मुद्देचार वर्षांत परवानगी घेणाऱ्यांची संख्या २३० ने घटली

राजीव सिंह।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकेकाळी फटाके फोडण्याची क्रेझ होती. दिवाळी सुरू होण्याच्या एक महिना आधीच फटाक्यांची दुकाने सजायला सुरुवात व्हायची. लहान मुलांपासून तर युवक फटाके फोडण्यासाठी आतूर असायचे. परंतु पर्यावरणाविषयीची आस्था वाढल्याने मागील काही वर्षात फटाके विक्रीसाठी परवानगी घेणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या चार वर्षात फटाके विक्रीसाठी परवानगी घेणाऱ्यांची संख्या २३० ने घटली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही चांगली बातमी आहे.वर्ष २०१६ मध्ये ९८२ दुकानांना ना हरकत पत्र देण्यात आले होते तर २०१९ मध्ये परवानगी घेणाऱ्यांची संख्या ७५२ झाली आहे. विशेष म्हणजे या वर्षी त्रिमूर्तीनगर येथील अग्निशमन केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. येथे ना हरकत प्रमाणपत्रासाठी ११२ दुकानदारांनी अर्ज केले आहेत. या अर्जधारकांना गृहीत न धरल्यास परवानगी घेणाऱ्यांची संख्या दरवर्षी घटली आहे. तसेच फटाका दुकान लावण्यासाठी असलेले कठोर नियम व शर्तीचाही परिणाम दुकानांच्या संख्येवर झाला आहे.आकडेवारीचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त कळमना अग्निशमन केंद्रात १०, सुगतगर १०, कॉटन मार्के ट येथे ३ अर्जधारक वाढले आहेत. शहरालगतच्या वस्त्या त फटाक ा दुकान लावण्याासाठीच्या अर्जात काही प्रमाणात वाढ झाली आहे. नरेंद्र नगर येथे परवानगी घेणाºयांच्या संख्या सर्वाधिक १०४ ने कमी झाली आहे. सिव्हील लाईन येथे ३१, गंजीपेठ ३ ,सक्करदरा १७ तर लकडगंज येथे ५ अर्जधारक कमी झाले आहे.फटाक्याचे दुकान लावण्यासाठी अग्निशमन विभागाच्या परवानगीसोबतच स्थानिक पोलीस स्टेशन, स्फोटके विभाग आदीकडून परवानगी घ्यावी लागते. आग नियंत्रणासाठी यंत्रणा ठेवावी लागते. यावेळी परवानगी घेताना मालमत्ता कर थकीत नसल्याबाबत कागदपत्रे सादर करावी लागली. यामुळे अर्जधारकांची संख्या कमी झाली आहे.मोबाईलचाही परिणामगेल्या दशकात स्मार्ट मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दिवाळीला सुरुवात होताच मोबाईलवर इको फ्रेंडली दिवाळी साजरी करण्याचा मेसेज सर्वत्र पसरतो. तसेच मोबाईलचा अधिक वेळ वापर करणाऱ्या युवकांची संख्या वाढली आहे. यामुळे पूर्वीसारखे फटाके खरेदी के ले जात नाही. परिणामी दुकानांची संख्या कमी झाली आहे.

टॅग्स :fire crackerफटाके