इंग्लंडहून नागपुरात आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह!; नव्या स्ट्रेनच्या भीतीने प्रशासन सतर्क

By मोरेश्वर येरम | Updated: December 24, 2020 14:30 IST2020-12-24T14:17:31+5:302020-12-24T14:30:13+5:30

तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचण्याचंही काम सुरु झालं आहे.

covid positive Nagpur man with UK travel history suspected of carrying new virus strain | इंग्लंडहून नागपुरात आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह!; नव्या स्ट्रेनच्या भीतीने प्रशासन सतर्क

इंग्लंडहून नागपुरात आलेला तरुण कोरोना पॉझिटीव्ह!; नव्या स्ट्रेनच्या भीतीने प्रशासन सतर्क

ठळक मुद्देइंग्लंडहून नागपुरात आलेला तरुन कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशयतरुणाच्या कोरोना चाचणीचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेत२९ नोव्हेंबर रोजी इंग्लंडहून नागपुरात दाखल झाला होता तरुण

नागपूर
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने धुमाकूळ घातलेला असताना इंग्लंडून नागपुरात दाखल झालेला एक तरुण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. चिंताजनक बाब अशी की इंग्लंडच्या प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा २८ वर्षीय तरुण कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा रुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन आता सतर्क झाले आहे. बाधित तरुणावर उपचार सुरु असून त्याचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. 

तरुण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचण्याचंही काम सुरु झालं आहे. इंग्लंडमधून आल्यानंतर हा तरुण नागपूरसह गोंदियात अनेकांच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आली आहे. 

इंग्लंडवरुन नागपुरात परतलेल्या युवकाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा २९ नोव्हेंबर रोजी नागपुरात आला होता. भारतात उतरल्यानंतर विमानतळावर त्याची कोरोना चाचणी झाली होती. पण त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. काही दिवसांनंतर तरुणाला कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यानंतर १५ डिसेंबरला त्यानं पुन्हा चाचणी केली. ही चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या तरुणाला वास ओळखता न येण्याचं लक्षण दिसत असून त्याची प्रकृती उत्तम आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या त्याचे कुटुंबिय आणि मित्र परिवाराचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. 
 

Web Title: covid positive Nagpur man with UK travel history suspected of carrying new virus strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.