शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

बंटी-बबलीची लग्न समारंभात हातचलाखी; ८ लाखांचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2021 1:02 PM

लग्न समारंभात सहभागी झालेल्या बंटी-बबलीने संधी मिळताच पावणेतीन लाखांच्या रोकडसह आठ लाखांचा ऐवज लंपास केला.

ठळक मुद्देपावणेतीन लाखांच्या रोकडसह आठ लाखांचा ऐवज लंपासलग्न सोहळ्यात खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संगीत समारोहात कुटुंब व्यस्त असल्याची संधी साधून पाहुणे म्हणून सामील झालेल्या बंटी-बबलीने वधूच्या खोलीत ठेवलेली बॅग लंपास केली. या बॅगमध्ये  पावणेतीन लाखांच्या रोकडसह आठ लाखांचे दागिने होते. ही घटना कळमना रिंग रोडवरील एका लॉनमध्ये सोमवारी रात्री घडली.

भोपाळ (मध्य प्रदेश) येथील इको ग्रीन पार्कमध्ये राहणारे अनिल पुरणचंद जैन (वय ५१) यांच्या मुलीचा विवाह सोहळा यशोधरानगरातील हमलोग लॉनमध्ये आयोजित करण्यात आला होता. सोमवारी रात्री १० च्या सुमारास संगीत संध्या सुरू असताना या समारंभात सहभागी झालेल्या एक तरुण आणि तरुणीने वरवधूच्या रुममध्ये ठेवलेल्या सामानातील एक बॅग चोरून नेली. या बॅगमध्ये २ लाख, ७५ हजारांची रोकड, दोन मोबाईल आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख, ९७ हजारांचा ऐवज होता. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर लग्नसोहळ्यात एकच खळबळ उडाली.

ती सराईत जोडगोळी

जैन यांनी या धाडसी चोरीच्या घटनेची माहिती यशोधरानगर पोलिसांना कळविली. पोलिसांनी चोरीचा छडा लावण्यासाठी लॉनमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक तरुण-तरुणी ही बॅग चोरताना दिसून आले. ज्या पद्धतीने ते लग्न सोहळ्यात वावरत होते, त्यावरून ही जोडगोळी सराईत असावी, असा अंदाज बांधण्यात आला आहे. हे बंटी-बबली कोण, ते मात्र स्पष्ट झाले नाही. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीmarriageलग्न