शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणीचे वेळापत्रक कोलमडले

By admin | Updated: May 17, 2014 01:03 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला.

१२ तास चालली प्रक्रिया : टपाल मतांसाठीही विलंब

नागपूर: लोकसभा निवडणुकीचा निकाल चार तासात घोषित करण्याचा जिल्हाधिकार्‍यांनी केलेला दावा प्रत्यक्षात मतमोजणीच्या वेळी फोल ठरला. सकाळी ८ वाजतापासून सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री ७.३0 पर्यंंत चालली. १२ तासापेक्षा जास्त वेळ यासाठी लागला.

लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी चार तासात मतमोजणीची प्रक्रिया संपेल, असे नियोजन केले जाईल, असे पत्रकारांना सांगितले. होते. मतमोजणीच्या एक दिवस आधी त्यांनी मतमोजणी ४ वाजता संपेल असे सांगितले होते. प्रत्यक्षात नागपूरचा निकाल जाहीर करण्यास सायंकाळ व रामटेकचा निकाल जाहीर होण्यास रात्रीचे ७.३0 वाजले. टपाल मतमोजणीची प्रक्रिया चार तासात पूर्ण केली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. पण प्रत्यक्षात त्यालाही विलंब झाला. रामटेकच्या टपाल मतांची मोजणी दुपारी ३ वाजता तर नागपूरच्या टपाल मतांची मोजणी ५ वाजता पूर्ण झाली.

मतमोजणीस्थळी प्रथमच वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. एका विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रतिनिधींना दुसर्‍या मतदारसंघात प्रवेश करता येत नव्हता. दोन रांगेत प्रत्येकी दहा असे एकूण वीस टेबल लावण्यात आले होते. मतमोजणीलाही नियोजित वेळेपेक्षा अध्र्या तासाने म्हणजे ८.३0 वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीचा कल बरोबर १0 वाजता जाहीर करण्यात आला. पण त्यानंतरच्या फेर्‍यांचा कल जाहीर करण्यास विलंब होत गेला. फेरीनिहाय निकाल जाहीर करताना अनेक वेळा खुद्द जिल्हाधिकार्‍यांना अडथळे आले. रामटेकच्याबाबतीत असा प्रकार घडला नाही.

रामटेकच्या तुलनेत नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीची प्रक्रिया संथ होती. मात्र फेर्‍या कमी असल्याने नागपूरचा निकाल आधी जाहीर करण्यात आला. मतदानस्थळी पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. प्रत्येकाला सुरक्षेच्या तीन टप्प्यातून जावे लागत होते. त्याचा फटका अनेकांना बसला.

मतमोजणीच्या कामात असलेल्या कर्मचार्‍यांच्या भोजनाकडे प्रशासनाने यंदा काळजीपूर्वक लक्ष दिले असले तरी पत्रकारांसाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली नव्हती. पत्रकारांसाठी तयार करण्यात आलेल्या मीडिया कक्षातही इतर कर्मचार्‍यांनीच ठाण मांडले. त्यामुळे बसावे कुठे, असा प्रश्न प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना पडला. कक्षातील टीव्ही पाहण्यातच कर्मचारी व्यस्त असल्याने त्याचाही फटका माध्यमांच्या प्रतिनिधींना बसला. कक्षात पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. केवळ औपचारिकता म्हणून हा कक्ष सुरू करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. (प्रतिनिधी)